Sarpanch : किंदरवाडीत सरपंच, ३ सदस्य अपात्र

तासगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह अन्य तीन सदस्यांना सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्‍हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे.
Sarpanch : किंदरवाडीत सरपंच, ३ सदस्य अपात्र
Summary

तासगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह अन्य तीन सदस्यांना सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्‍हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे.

पेड - तासगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह अन्य तीन सदस्यांना सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्‍हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. कारवाईने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सात सदस्य संख्या असलेली किंदरवाडी ग्रामपंचायत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांची निवड झाली. मात्र, तक्रारदार नारायण निवृत्ती सूर्यवंशी व प्रशांत नारायण सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे चार सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला. त्यात म्हटले होते, की किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करावे. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ व १४ (१) (ज ३) नुसार सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या दालनात अर्जावर वेळोवेळी सुनावणी झाली. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करून सरपंच राजश्री कचरे, अनिता कचरे, धोंडिराम कचरे व शोभा जाधव या चार सदस्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवत ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान, या आदेशात संबंधितांना प्रस्तुत आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त (पुणे) यांच्याकडे अपील दाखल करण्यास १५ दिवसांचा अवधी देत असल्याचे म्हटले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह तीन सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने तासगाव तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर संबंधितांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागणार की ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com