लोकवस्तीत आढळला अकरा फुटी किंग कोब्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

खानापूर (जि. बेळगाव) - खानापूर तालुक्‍यातील लोकवस्तीत शुक्रवारी "किंग कोब्रा' (राजनाग) आढळला. सर्पमित्र आनंद चिट्टी व निर्झरा चिट्टी यांनी वनखात्याच्या सहकार्याने असोग्याजवळील शिवारात अकरा फुटी किंग कोब्रा पकडला.

कुटिन्होनगराजवळ मलप्रभा नदीकाठी असलेल्या निरुपाद कांबळे यांच्या शिवारात हा "किंग कोब्रा' गेल्या पाच दिवसांसून नजरेस पडत होता. स्थानिक रहिवाशांनी याबाबत वनखात्याला कळविले होते. खानापूरचे सहायक वनसंरक्षक सी. बी. पाटील यांनी येळ्‌ळूरचे सर्पमित्र आनंद चिट्टी यांना याबाबत माहिती दिली. आनंद चिट्टी यांनी पत्नी निर्झरा यांच्या मदतीने शुक्रवारी सकाळी "किंग कोब्रा'ला पकडले. किंग कोब्राची ही मादी आहे. राजनाग पकडल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी वनखात्याच्या खानापुरातील कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती.

खानापूर (जि. बेळगाव) - कुटिन्होनगराजवळ मलप्रभा नदीकाठी शिवारात आढळलेल्या 11 फुटी "किंग कोब्रा'सह सर्पमित्र आनंद चिट्टी.

Web Title: king kobra receive in public place

टॅग्स