आधी भरपाई; मगच काम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सांगली - रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठीचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने सुरू असून, ही प्रक्रिया योग्य व्हावी, त्याची भरपाई मिळावी आणि नंतरच काम सुरू करावे या मागणीसाठी किसान सभेने आज मोर्चा काढला. येथील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना दोन दिवसांत तहसीलदार न्यायनिवाडे करतील, असे सांगितले.

श्री काळम पाटील म्हणाले,‘‘ पहिल्या टप्प्यात जमिन अधिग्रहणांसाठी ५०० कोटी आले असून गरज ३ हजार कोटींची आहे. सर्व प्रक्रिया कायद्यांच्या चौकटीत होईल. ’’ 

माजी मंत्री अजितराव घोरपडे, किसान सभेचे उमेश देशमुख, नामदेव करगणे, दिंगबर कांबळे, संजय पाटील शिष्टमंडळात होते. कंत्राटदाराने शेतकऱ्यांच्या बांधावर असलेली झाडे, तोडायला सुरवात केली आहे. 

ही वृक्षतोड रोखणाऱ्यांवर केसेस घातल्या आहेत. सध्या अस्तित्वात असलेला राज्य महामार्गाच्या नोंदी सातबारा वरही नाहीत. नकाशावर हा राज्य महामार्ग आठ फूट रुंदीचा दाखवला आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्यातरी रीतसर अधिग्रहण व त्याचे मूल्यांकन रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्यावरच यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी होईल. मग झाडांचा पंचनामा करून वृक्षतोड करावी लागेल. ही बाब कोणीच ऐकायला तयार नाही. अशी तक्रार  आंदोलकांनी केली. सुदर्शन घेरडे, शामजी पाटील, माणिक पाटील, सुनिल कदम, वैभव सरवदे, रावसो पाटील, दत्तात्रय शिंदे, किशोर सावंत, बाळासाहेब साठे, कृष्णदेव डुबुले यांचा आंदोलनात सहभाग होता.

प्रमुख मागण्या 
विहिरी, कुपनलिका, पाईपलाईन, घर बांधकामांचे मुल्यमापन करुन मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. यापूर्वी चुकीचे सर्व्हे रद्द करावेत, जमिनीचा दर बाजारभावाने  द्यावेत. आजपर्यंतचे निवाडे रद्द करुन नव्याने मुल्यांकन करावे, आंदोलकांवर कायदेशीर कारवाईची पाठवलेली पत्रे रद्द करावीत.

Web Title: Kisan Sabha Morcha Farmer Compensation