(video) : वुई.. वुई... कापेऽऽऽ... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

निरभ्र आकाश हळूहळू रंगबेरंगी पतंगांनी व्यापून गेले. पतंगांच्या विविध आकृत्या दिसू लागल्या. सारेच सरसावून गच्चीवर, मैदानात जमायला लागले. फर...फर आवाजात पतंग आकाशात भरारी मारू लागले. जोडीला होता, हिंदी-मराठी गाण्यांची साथ. पतंग उडविताना मोठी चुरस दिसत होती.

नगर : सकाळच्या बोचऱ्या थंडीतच पतंग, मांजा, चकरी घेऊन बालगोपाळाचा लवाजमा छतावर जमा झाला नि सुरू झाली जल्लोषाला सुरवात.

क्‍लिक करा- शनिशिंगणापुरात लटकू बंदचा निर्णय फत्ते

निरभ्र आकाश हळूहळू रंगबेरंगी पतंगांनी व्यापून गेले. पतंगांच्या विविध आकृत्या दिसू लागल्या. सारेच सरसावून गच्चीवर, मैदानात जमायला लागले. फर...फर आवाजात पतंग आकाशात भरारी मारू लागले. जोडीला होता, हिंदी-मराठी गाण्यांची साथ. पतंग उडविताना मोठी चुरस दिसत होती. दोन पतंगांची लागलेली चढाओढ नि पतंग कापल्यावर "वुई वुई... कापेऽऽऽ..' असा मोठ्या आवाजात होणारा गलका लक्ष वेधून घेत होता.

पतंग कापण्यासाठी चढाओढ

सकाळपासूनच "तीळगूळ घ्या, गोड गोड बोला'च्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या गेल्या. सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडला. लवकर उठण्याचा कंटाळा करणाऱ्या बाळगोपाळांनी सकाळीच इमारतीचे छत गाठले. काहींनी मित्रमंडळींसोबत मैदानाकडे मोर्चा वळविला. उंचच उंच पतंग उडविण्याची स्पर्धा लागली. एकमेकांशी स्पर्धा करताना पतंग कापण्यासाठी चढाओढ लागली होती. मोठ्या आनंदात उशिरापर्यंत शहरात पतंगोत्सव सुरू होता. तुटलेले पतंग मिळविण्यासाठी रस्त्यावरून लहानगे सैरावैरा धावत होते. 

अधिक वाचा- शाळांसाठी रोटरी उभारणार "व्हर्चुअल क्‍लासरुम'  

कमी प्रमाणात प्रतिसाद

पाइपलाइन रोड, सावेडी, माळीवाडा, नालेगाव भागात मोठ्या उत्साहात पतंग महोत्सव साजरा झाला. पूर्वी संक्रांतीच्या महिनाभर अगोदरच पतंगांची रेलचेल दिसायची. यंदा मात्र शहरातील बहुतांश भागात कमी प्रमाणात पतंग उत्सव दिसून आला. 

ovasa

राहुरी : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त महिलांनी देवळात केलेली गर्दी.

सुवासिनींचे एकमेकींना वाण

महिलांनीही कालपासूनच (मंगळवारी) संक्रांतीची तयारी केली होती. बाजारातून वाण, तीळगूळ, सुगड आदींची खरेदी केली होती. काही महिलांनी घरीच गुळ व तिळाची चिक्‍की व लाडू बनविले. शहरातील मंदिरांत विशेष पूजांचे आयोजन केले होते. दुपारी पुरणपोळीचा बेत आणि त्यानंतर सुगड, ओवसा व वाण घेऊन मंदिरांत महिलांची गर्दी झाली होती. सायंकाळी पारंपरिक वेशभूषेत घरोघरी हळदी-कुंकू व तीळगूळ वाटपाचा कार्यक्रम झाला. आपुलकी वाढविण्यासाठी सुवासिनींनी एकमेकींना वाण म्हणून भेटवस्तू दिल्या. लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kite Festival celebrated in nagar marathi news