"आय लव्ह पाचगणी' फेस्टीव्हलमध्ये पतंग महोत्सव उत्साहात

I Love Panchgani Festival Top Stroies In Marathi News
I Love Panchgani Festival Top Stroies In Marathi News

पाचगणी : फन, फूडबरोबरच काईट फेस्टिव्हल, दुर्मिळ छायाचित्र, शिल्प, रांगोळी प्रदर्शन अन्‌ झुंबा डान्सबरोबर विंटेज कार, शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाण्यांचे प्रदर्शन अशा विविधांगी, नानाढंगी आनंद देणाऱ्या पाचगणी फेस्टिव्हलची रंगत अधिक वाढू लागली आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
उद्‌घाटन सोहळ्यानंतर सर्वांनी आनंद घेतला तो मुख्य बाजारपेठेत आयोजित वॉकिंग प्लाझाचा. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या खवय्यांच्या स्टॉल्समधून खरेदी करण्याकरिता एकच झुंबड उडाली, तर आज सकाळपासून टेबललॅंडच्या विस्तीर्ण पठारावर निरभ्र आकाशात गरुड झेप घेणाऱ्या विविध आकाराच्या पतंगांचा स्वच्छंद विहार पाहण्याकरिता व ते हवेत उडविण्याकरिता देश विदेशातील पर्यटक, शालेय विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत विद्युतरोषणाईच्या झळाळीत हा पतंगबाजीचा आनंद लुटण्यात आला.

दुर्मिळ वाहनांचा लवाजमा

पाचगणी क्‍लब येथे जवाहर (जि. पालघर) येथील राजेंद्र महाले यांचे जीवनशैलीवर आधारित कॅनव्हास पेंटिंग, लाकडी वस्तू, पाचगणीतील देवराई येथील पेंटिंग, नागपूर येथील हरिचंद पुंगाटी यांच्या पितळेचा गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, घंटी, कासव व अन्य वस्तू या लक्षवेधी ठरत आहेत. मर्सिडीझ, बिटल, फियाट, जीप या दुर्मिळ वाहनांचा लवाजमा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

शिल्पांचा खजिना

बारामती येथील राहुल लोंढे यांचे लाकडाच्या मुळापासून आणि खोडापासून बनवलेले काष्ठशिल्प व त्यामध्ये प्राणी, सापाचे आकार, गणपती, मातृत्व कामिनी व मिस युनिव्हर्स असा शिल्पांचा खजिन्याने या प्रदर्शनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
 

ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनही

कोल्हापूर येथील हर्षद कुलकर्णी यांच्या फायबर व धातूच्या मूर्ती, लॅंडस्केप व पोर्ट्रेट लक्ष वेधून घेत आहेत, तर वाई येथील प्रसाद बनकर यांचे दुर्मिळ छायाचित्र व शिवकालीन वापरात नसलेली मात्र इतिहासाची साक्षीदार असलेल्या वाघनखी, दांडपट्टा, ढाल, बिचवे अशा ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनही लक्षवेधी ठरले आहे. कलेचा आस्वाद घेण्याकरिता दाखल होणाऱ्यांसाठी मयूर भिलारकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संगीतमय सादरीकरणाने वातावरण भारावून जात आहे, तर "छोटा भीम' चिमुकल्यांची करमणूक करत आहे.

दरम्यान टाऊन हॉल येथे स्थानिक कलाकारांनी रेखाटलेल्या रंगावलीचे प्रदर्शन व कोल्हापूर येथील मिलिंद सरनाईक यांचे वूडन कोलाज पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.




Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com