अहंकार फेका, ध्येयासाठी सज्ज व्हा

अहंकार फेका, ध्येयासाठी सज्ज व्हा

कोल्हापूर - ‘कुठल्याही क्षेत्रात असलात, तरी अहंकार फेका आणि ध्येय गाठण्यासाठी झपाटून कामाला लागा’, असा मौलिक मंत्र आज माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिला. महापालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. दहा आदर्श शिक्षक, दोन विशेष शिक्षक, तर दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

माजी राज्यपाल डॉ. पाटील यांनी ध्येयाचा पाठलाग केल्याशिवाय यश नाही, असे सांगताना विविध उदाहरणे दिली. शिक्षण समिती सभापती अशोक जाधव म्हणाले, ‘‘गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ वरिष्ठ वेतनश्रेणी प्रलंबित होती. मात्र, आता लवकरच वेतनश्रेणीचा लाभ महापालिका शाळांतील ६९ शिक्षकांना होणार आहे. पालिकेच्या शाळांच्या गुणवत्तेत भर करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’

महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पुरस्कारप्राप्त शिक्षक युवराज सरनाईक, मुख्याध्यापिका सुप्रिया देशपांडे, प्रशासनाधिकारी एस. के. यादव, समिती सदस्या रूपाराणी निकम यांनी मनोगते व्यक्त केली. स्वाती लंगडे, विष्णू परीट, चारुशीला बिडवे, युवराज सरनाईक, शैलजा पाटील; तर खासगी अनुदानित शाळांतील सुप्रिया देशपांडे, संगीता साळोखे, गिरिजा जोशी, शिवाजी भोसले, सुनीता हंकारे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. संतोष आंबेकर आणि रूपेश नाडेकर यांचा विशेष पुरस्काराने; तर मोहन हांडे आणि नामदेव जाधव यांचा आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव झाला. यावेळी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त विलास आंबोळे, प्रभाकर आरडे, प्रभाकर हेरवाडे, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संचालक अशोक देसाई, नगरसेविका छाया पोवार, मेहजबिन सुभेदार, नगरसेवक श्रावण फडतारे, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई, शिक्षक संघटनांचे सुनील गणबावले, संजय पाटील, सुधाकर सावंत, द्रोणाचार्य पाटील, अभिजित जाधव आदी उपस्थित होते. 

अशोक जाधव उपमहापौर ?
समिती सभापती अशोक जाधव यांनी प्रास्ताविकात डॉ. डी. वाय. पाटील यांची आपण महापौर किंवा उपमहापौर व्हावे, अशी इच्छा असल्याचे सांगितले. त्याचा संदर्भ घेत डॉ. पाटील यांनी जाधव यांना पदासाठी शुभेच्छा असल्याचे सांगितले. त्याशिवाय बोंद्रे घराण्याचा वारसा महापौर शोभा बोंद्रे नेटाने पुढे नेत असून त्यांनाही आमदारकीसाठी शुभेच्छा असल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com