महावितरणच्या कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सांगली : खंडित झालेला विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यास दमबाजी करत एकाने चाकू हल्ला केला. श्रेयस प्रविणकुमार शहा (22, रा. सांगलीवाडी) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हल्ल्यात शहा गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खणभागातील कार्यालयात सोमवारी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित हल्लेखोर साहिल मुल्ला आणि तिघे अनोळखी यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की श्रेयस शहा 2017 मध्ये अनुकंपाखाली महावितरणमध्ये भरती झाले. सध्या ते खणभागातील कार्यालयात विद्युत सहायक कार्यरत आहेत. सोमवारी (ता.27) नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता कार्यालयात आले. कार्यालयीन कामकाज संपवून पाच वाजता घरी निघाले होते. त्यावेळी अन्य कर्मचारी गैरहजर असल्याने पुढील शिफ्टचे कामही करावे, असे लाइनमन प्रफुल्ल श्रीरामे यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी काम सुरू केले. दरम्यान, मकान गल्लीतील नाईकवाडामधून अल्लाबक्ष अमीन मुल्ला यांनी घरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार शहा यांनी मदतनीस प्रसाद व्हसवाडे यांना घेवून मुल्ला यांच्या घरी गेले. तेथील मीटरची तपासणी केली. त्यावेळी पथदिवे सुरु असल्याने हे काम दुरूस्त होणार नाही, असे सांगून निघून आले. पुन्हा एका तक्रारीसाठी सारे जण गेले. 

त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पुन्हा कार्यालयात परतले. त्यावेळी साहिल मुल्ला व त्याचे आठ साथीदार शहा यांचा शोध घेत होते. शहा तेथे गेले. त्यावेळी साहिलने शहा यांच्यावर दमबाजी करण्यास सुरूवात केली. घरातील विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी मारहाण करण्यात आली. त्यानंतर साहिलने खिशातील चाकू काढून थेट हल्ला चढवला. अन्य तिघांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यात शहा यांच्या कपाळावर, नाकावर गंभीर इजा झाली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थिने ही मारामारी सोडवण्यात आली. रक्तबंबाळ झालेल्या शहा यांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

घटनेचा निषेध 
घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी खणभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वीज क्षेत्रातील संघटनांची संयुक्त कृती समितीने केली. याबाबतचे निवेदनही पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.

Web Title: Knife attack on MSEB employees