Photo : 'मधुबनी चित्रशैली' आहे तरी काय ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

अभिजात भारतीय लघुचित्र शैली ही भारतीय चित्रपरंपरेतील प्रमुख शैली. मात्र, ब्रिटिशांच्या काळात ही शैलीच गायब झाली. पुढे पेशवे काळात ती बऱ्यापैकी काही चित्रकारांनी जाणीवपूर्वक पुढे आणली. मात्र, आता ती पूर्णपणे नष्ट होतेय की काय, असे चित्र असताना मी जाणीवपूर्वक या शैलीमध्ये काम करते आहे.

कोल्हापूर - राम-जानकीच्या विवाहासाठी जेव्हा मिथिलानगरी सज्ज होत होती, तेव्हा जनक राजाने प्रसंगानुरूप चित्रे काही चित्रकारांकडून काढून घेतली अशी एक आख्यायिका आहे. ती वैशिष्ट्यपूर्ण व वेगळ्या शैलीमधील चित्रकला म्हणजेच "मधुबनी चित्रशैली'. येथील ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रे "मिथिला' किंवा "मधुबनी' या नावाने जगप्रसिद्ध आहेत. त्यातही तीन प्रकार आहेत. भित्तिचित्रे, साड्या असोत किंवा कॅनव्हासवरदेखील ही शैली लोकप्रिय आहे. हिंदू देवी-देवतांचे, पौराणिक, रामायणामधील प्रसंग, शिव-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण, लक्ष्मी यांची विविध प्रसंगांतील चित्रे, लयबद्ध आकार, गडद, नैसर्गिक रंग, वापरताना रंगसंगतीची विशेष काळजी घेतली जात नाही. मूळ चित्र काढून झाल्यावर कॅनव्हासवर रिकामी जागा अजिबात ठेवली जात नाही. ही जागा पाने, फुले, तुळस, साप, मासे, वेलबुट्टी, कासव, कमल अशी चिन्हे-चित्रे वापरून भरली जाते. 

अभिजात भारतीय लघुचित्र शैली ही भारतीय चित्रपरंपरेतील प्रमुख शैली. मात्र, ब्रिटिशांच्या काळात ही शैलीच गायब झाली. पुढे पेशवे काळात ती बऱ्यापैकी काही चित्रकारांनी जाणीवपूर्वक पुढे आणली. मात्र, आता ती पूर्णपणे नष्ट होतेय की काय, असे चित्र असताना मी जाणीवपूर्वक या शैलीमध्ये काम करते आहे. मात्र, ही शैली आत्मसात करताना "पेशन्स' खूप महत्त्वाचे असतात. मधुबनी शैलीमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. 
मुळात कलेचा वारसा घरातूनच मिळाला. आजोबा गणपतराव अडूरकर हे व्यवसायाने इंजिनियर; पण चित्रकलेची त्यांना भारी आवड. वडील शामराव अडूरकर यांनाही चित्रकलेची तितकीच आवड. त्यामुळे लहानपणापासूनच या कलेशी जोडले गेले. 1999 मध्ये जीडी आर्ट केले आणि त्यानंतर आर्ट टीचर डिप्लोमाही पूर्ण केला. 

याशिवाय मिनिएचर पेन्टिंग यालाच लघुचित्रकला असे म्हटले जाते. यामध्ये पूर्ण चित्राचा विचार केला जातो, जसे की प्रत्येक भागाचे तपशीलवार चित्रण. त्यातील छोटे छोटे बारकावे रेखाटावे लागतात. ही पेंटिंगही मी आत्मसात केली आहे. 

मुळात बारीक काम असणाऱ्या कलाकृती करतानाच अस्सल भारतीय शैलीविषयी नव्या पिढीलाही माहिती व्हावी, या उद्देशाने या कलाप्रकारांवर जाणीवपूर्वक भर दिला आहे. मात्र, स्वतःच्या मनाला भावतील अशाच कलाकृती साकारते. सध्या या कलेच वारसा अविरतपणे पुढे चालवत मुंबईत मुलांनाही याचे शिक्षण देत आहे. 
- उमा अडूरकर-वाडेकर 
 

Video :  मावळतीच्या किरणांनी उजळले करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे मुखकमल 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know About Madhubani Chitrashaili