...तर तुम्ही व्हाल व्हॉट्‌सॲपकडून ‘बॅन’

...तर तुम्ही व्हाल व्हॉट्‌सॲपकडून ‘बॅन’

कोल्हापूर - भारतात सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या गळ्यातील ताईत असणारे व्हॉट्‌सॲप न वापरणारा क्वचितच एखादा आढळेल. एवढे असंख्य वापरकर्ते असूनही वापरकर्त्यांना या व्हॉट्‌सॲपबद्दल फार कमी गोष्टी माहीत आहेत.

माहितीची देवाणघेवाण करणे आणि आपल्या मनातील भावना दुसऱ्यांपर्यंत पोचविण्याचे हे सहज आणि सोपे माध्यम आहे. १.५ अब्ज जगभरातील वापरकर्ते असणाऱ्या या ॲपवर दिवसभरात वापरकर्त्यांच्या सहापट मेसेजेसची देवाणघेवाण होते. मात्र, व्हॉट्‌सॲप तुम्हाला नेहमी वापरण्यासाठी ब्लॉक करू शकते, हे माहीत आहे काय? चला जाणून घेऊया, 

तुम्हाला का आणि कोणत्या परिस्थितीमुळे लागू शकतो ‘बॅन’.
व्हॉट्‌सॲपने जाहीर केलेल्या या निर्देशांचे पालन न केल्यास व्हॉट्‌सॲप तुम्हाला ‘बॅन’ करू शकते. याचबरोबर चीन, इराण, तुर्की आणि युगांडा या देशांमध्ये व्हॉट्‌सॲप वापरण्यास संपूर्ण बंदी आहे.

काय आहेत निकष..?

  •  व्हॉट्‌सॲपच्या निर्देशानुसार बेकायदा, अश्‍लील, बदनामीकारक, धमकी देणारे, भीती पसरविणारे, त्रास देणारे, द्वेषपूर्ण मेसेज तुम्हाला व्हॉट्‌सॲपवरून ‘बॅन’ करू शकतात.
  •  एखाद्या हिंसक गुन्ह्याचे चित्रण किंवा वर्णन करणारे मेसेज पाठविल्यास.
  •  एखाद्याचे खोटे अकाउंट तयार केल्यास अथवा तोतयेगिरी केल्यास.
  •  व्हॉट्‌सॲपच्या वापराद्वारे अनोळखी व्यक्तींना बल्क मेसेज, ऑटो डायलिंग, ऑटो फॉरवर्ड मेसेज करणे, जे व्हॉट्‌सॲपच्या निर्देशात बसत नाही असे केल्यास.
  •  व्हॉट्‌सॲप कोड बदलण्याचा प्रयत्न केल्यास. सर्व्हरवरील कोडशी छेडछाड केल्यास. 
  •  व्हॉट्‌सॲपवरून व्हायरस अथवा मालवेअर पाठविल्यास.  
  •  व्हॉट्‌सॲप हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास अथवा एखाद्यावर पाळत ठेवल्यास. 
  •  व्हॉट्‌सॲप प्लस नावाचे ॲप वापरल्यास. हे ॲप थर्डपार्टी डेव्हलपरकडून बनविले अाहे. या ॲपमुळे डेटा सुरक्षित राहण्याची शक्‍यता नसल्याचे व्हॉट्‌सॲपने स्पष्ट केले आहे. 
  •  अनेक लोकांनी जर तुम्हाला ब्लॉक केल्यास तुम्हाला ‘बॅन’ केले जाण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com