या 'कुत्र्यांचे" लाड करायचे किती? कुत्र्याच्या मालकाची भर रस्त्यात गुंडगिरी

युवराज पाटील
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोल्हापूर: केवळ कुत्र्याला गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून आज (सोमवार) सकाळी मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर रस्त्यावर एका उच्चशिक्षित व्यक्तीस कुत्र्याच्या मालकाने मोठी मारहाण केली. सकाळची वेळ त्यात वाहतूकीची कोंडी आणि वर्दळीच्या रस्त्यावर अकराच्या सुमारास ही घटना घडली.

कोल्हापूर: केवळ कुत्र्याला गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून आज (सोमवार) सकाळी मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर रस्त्यावर एका उच्चशिक्षित व्यक्तीस कुत्र्याच्या मालकाने मोठी मारहाण केली. सकाळची वेळ त्यात वाहतूकीची कोंडी आणि वर्दळीच्या रस्त्यावर अकराच्या सुमारास ही घटना घडली.

मोठ्या आकाराची कुत्री पाळणे हा अलीकडे काही लोकांचा छंद झाला आहे. व्यावसायिक कुत्र्यांची विक्री करणाऱ्या व्यक्तीचे याच परिसरात वास्तव्य आहे. कुत्री पाळणे ही बाब वैयक्तीक असली तरी सार्वजनिक रस्त्यावर कुत्र्यांना फिरविण्यासाठी आणले जाते. वर्दळीचा रस्ता, त्यात वाहनांची गर्दी यात ही मोठी कुत्री यामुळे मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर या एकमार्गी रस्त्यावर छोटमोठे अपघात होतात. त्यात सोमवार हा वर्कीग डे उजाडला की आणखी पंचाईत होते. वाहतूक, शाळेच्या रिक्षा. विद्यार्थी आणि वाहनांची गर्दी अभुतपुर्व कोंडी होती. दररोज सकाळी नेमक्‍या याच वेळा पाळीव कुत्रे फिरविण्यासाठी आणले जाते. एकतरी हे कुत्रे आकाराने मोठे आहे, त्यामुळे त्याच्या जवळूनही कुणी जाऊ शकत नाही.

मोतीबाग तालमीसमोर रिक्षाथांबा आहे तेथे कुत्र्याला घेऊन मालक जात होता. नकळत गाडीची धडक कुत्र्याच्या पायाला लागली. गाडीचा चालकाच्याही बाब ध्यानात आली नाही. ट्रेनर आणि संबंधित व्यक्ती वाद सुरू झाला, तोपर्यंत वाहतूकीची मोठी कोंडी झाली. मालकाने थेट मारहाण करण्यास सुरवात केली. दूसऱ्या ट्रेनरनेही यात हात धुऊन घेतले. ट्रेनरची गुंडगिरी इतकी होती की बघ्यांचेही पुढे जाण्याचे धाडस झाले नाही. एरव्ही पोलिस परवाने तपासण्यासाठी या रस्त्यावर असतात. नेमके ते हे याचवेळी नव्हते. मारहाण झालेली ती व्यक्ती निमूटपणे गाडीत बसून निघून गेली. चेहऱ्याला दुखापत झाली होती. संबंधित व्यक्ती अंबाई टॅंक परिसरातील रहिवाशी असल्याचे समजते.

पाळीव कुत्र्यांमुळे मनस्ताप
शहरात मोकळी मैदाने तसेच रंकाळा चौपाटी येथे पाळीव कुत्रे सकाळी हौसने आणली जातात. भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी कुत्री घाण करतात. कुत्री पाळण्याचा छंद यांचा आणि मनस्ताप अन्य नागरिकांना अशी सर्वच ठिकाणी अवस्था आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास 

Web Title: kolahpur news The dog's owner beat the car driver