कोल्हापूरचे विमानतळ लवकरच सुरू करू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळासाठी रखडलेले भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लावण्याबरोबरच विमानतळही लवकरात लवकर सुरू केले जाईल, असे आश्‍वासन नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज ही माहिती दिली. 

याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोल्हापूर विमानतळाचे प्रश्‍न रेंगाळलेले आहेत. या प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठीच आज केंद्रीय मंत्री राजू यांची भेट घेतली. अनेक वर्षांपासून रखडलेला भूसंपादनाचा विषय व बंद असलेले विमानतळ तातडीने सुरू करणे यावर आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मागण्यांचे निवेदनही दिले. मंत्र्यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन तांत्रिक अडचणी सोडविण्याचे आदेश दिले.’’ हवाई वाहतूकमंत्री राजू यांनी विमानतळासंदर्भात सर्वच अडचणी सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याचेही संभाजीराजे यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Kolhapur airport to start soon