कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. गावडे, उपाध्यक्षपदी ॲड. पाटील

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. गावडे, उपाध्यक्षपदी ॲड. पाटील

कोल्हापूर - जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत सत्तारूढ ॲड. रणजित गावडे पॅनेलने १५ पैकी ११ जागा जिंकत बाजी मारली. अध्यक्षपदी ॲड. रणजित गावडे तर उपाध्यक्षपदी देसाई पॅनेलचे ॲड. जयेंद्र पाटील यांची निवड झाली.

देसाई पॅनेलला फक्त चारच जागांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी करत जल्लोष केला. जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिवासह १५ जागांसाठी आज न्यायसंकुलात मतदान झाले. 

सत्तारूढ ॲड. गावडे तर विरोधी ॲड. प्रशांत देसाई यांच्या पॅनेलमध्ये ही लढत झाली. दोन अपक्ष सदस्यांसह एकूण ३२ उमेदवार रिंगणात होते. एकूण २२८० मतदारांपैकी १७८० मतदारांनी मतदान हक्क बजावला. एकूण ७८ टक्के मतदान झाले. सायंकाळी सहानंतर मतमोजणीस सुरवात झाली.

मतपेट्यांतील मतपत्रिकांची टप्प्याटप्प्याने मोजणी करण्यास सुरवात झाली, तशी निकालाबाबत वकिलांच्यात उत्कंठा वाढू लागली. रात्री नऊनंतर एक-एक निकाल बाहेर येऊ लागला, तसा विजयी उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष सुरू झाला. अंतिम निकाल मुख्य निवडणूक निर्णयाधिकारी ॲड. सुभाष पिसाळ यांनी जाहीर केला. अध्यक्षपदासाठी उभे असणारे सत्तारूढ पॅनेलचे ॲड. गावडे यांना ९२५ मते मिळाली तर विरोधी गटाचे ॲड. देसाई यांना ८४७ मते मिळाली.

उपाध्यक्षपदासाठी उभे असलेल्या देसाई गटाचे ॲड. जयेंद्र पाटील यांना ९२९ तर सत्तारूढचे ॲड. नामदेव हातकर यांना ८३३ मते मिळाली. यानंतर सचिवपासून सदस्यांपर्यंतचे निकाल जाहीर झाले. 

विजयी उमेदवारांना मिळालेली मते 
नाव       पॅनेल         पद              मिळालेली मते 
ॲड. गुरुप्रसाद माळकर     सत्तारूढ     सचिव             ११०१
ॲड. पृथ्वीराज देशमुख        देसाई       सहसचिव           ९००
ॲड. रेश्‍मा भुर्के              सत्तारूढ     महिला प्रतिनिधी    ८९७
ॲड. अतुल जाधव             सत्तारूढ    लोकल ऑडिटर     ९३६
ॲड. वैभव काळे                  सत्तारूढ      सदस्य             ९६१
ॲड. योगेश नाझरे               सत्तारूढ      सदस्य              ९२८
ॲड. रमेश पवार                   देसाई        सदस्य              ७६४
ॲड. अजित पाटील             सत्तारूढ      सदस्य              ९१३
ॲड. कादंबरी मोरे               सत्तारूढ     सदस्य             १००९
ॲड. सर्वेश राणे                    देसाई       सदस्य               ८८१
ॲड. शिल्पा सुतार                सत्तारूढ    सदस्य               ८८८
ॲड. सपना हराळे                सत्तारूढ     सदस्य               ८९९
ॲड. अमित पाटील              सत्तारूढ    सदस्य               ९३६

विजयात माजी अध्यक्ष ॲड. विवेक घाटगे, ॲड. प्रकाश मोरे, ॲड. प्रशांत चिटणीस यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचा वाटा आहे. सर्किट बेंचसह जाहीरनाम्यातील सर्व प्रश्‍न सर्व वकिलांना सोबत घेऊन मार्गी लावणार. सत्तारूढ गटावर सदस्यांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. 
- ॲड. रणजित गावडे,
नूतन अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com