बेळगाव-कोल्हापूर वाहतूक बंद; बेळगावमध्ये हायअलर्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

निपाणी नजीक महामार्ग रोखला गेला असून कुणीही या मार्गावर उद्या दुपारपर्यंत प्रवास करू नये असे आवाहन आयजीपी राघवेन्द्र सुहास यांनी केले आहे.

बेळगाव : महाराष्ट्रात होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका बसून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे-बंगळूर महामार्गावर दरड कोसळल्याने बेळगाव ते कोल्हापूर वाहतूक बंद झाली आहे.

निपाणी नजीक महामार्ग रोखला गेला असून कुणीही या मार्गावर उद्या दुपारपर्यंत प्रवास करू नये असे आवाहन आयजीपी राघवेन्द्र सुहास यांनी केले आहे.

वाहतूक रोखण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील धरणे पूर्णपणे भरली आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सर्व नद्यांनी आपल्या धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर्ण बेळगाव जिल्ह्याला हाय अलर्ट देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur belgaum highway closed rain alert in Belgaum