छटपूजेदरम्यान दिले सूर्याला अर्घ्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - दोन दशकांची परंपरा असलेल्या छटपूजेच्या व्रताला पंचगंगा नदीघाटावर आज प्रारंभ झाला. परिवारास सुख-समृद्धी लाभावी, याकरिता सृष्टीविधाता सूर्याकडे प्रार्थना करण्यात आली. राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाने पूजाविधीचे आयोजन केले होते. या वेळी महिला, पुरुष, युवक, युवतींनी पूजाविधीत सहभाग घेतला. 

आज सायंकाळी पाचच्या सुमारास सुवासिनींनी घाटावर रांगोळ्यांचा सडा घालून त्यावर उसाच्या साह्याने घटपूजा मांडली होती. घटामध्ये तुपाचे दिवे लावले होते. तसेच पूजेभोवतीही दिव्यांची आरास मांडली होती. 

सूप, करंड्यांमध्ये विविध फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फराळ, मिठाई ठेवली होती. फुलांचे हार, फुले, वस्त्र, वस्त्रांमध्ये विविध वस्तूंचा समावेश करून त्या उसाला बांधल्या होत्या. त्यानंतर साडेपाच ते साडेसहापर्यंत सुवासिनींनी सूप घेऊन सूर्यास्ताच्या प्रतीक्षेत पाण्यात उभे राहून प्रार्थना केली. या वेळी मंत्रोच्चारण केले.

सूर्याला सायंकालीन अर्घ्य दिले. घटामध्ये मांडलेला प्रसादही दाखविला. अशातऱ्हेने मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने हा पूजाविधी पार पडला. 
पूजाविधीनंतर घाटावर आतषबाजीही करण्यात आली. नदीच्या पात्रात दिवे सोडले. पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या, उदबत्ती, तसेच धुपाच्या सुगंधाने घाट परिसरात काही क्षण मांगल्य अवतरले. पूजाविधी पाहण्यासाठी कोल्हापूरवासीयांनीही गर्दी केली होती. सोमवारी (ता. ७) पहाटे पाच ते सकाळी सात या कालावधीत उगवतीच्या सूर्याला अर्घ्य देऊन सोहळ्याची सांगता होईल. दरम्यान, शुक्रवारी छटपूजेच्या व्रताला प्रारंभ झाला. या व्रताला ‘नहा-खाय’ असे म्हणतात. याबरोबरच ‘खरना व्रत’ही झाले.

दिवाळीनंतर छटपूजा व्रताला सहाव्या दिवशी प्रारंभ होतो. सलग अठ्ठेचाळीस तासांच्या उपवासानंतर आजचा मुख्य सोहळा झाला.  
 
सूर्यपूजेचा महत्त्वाचा उत्सव
छटपूजा हा बिहारमधील सूर्यपूजेचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव. बिहारमध्ये सूर्यपूजा पुरातन असून इस.पूर्व पाचव्या शतकापासून सम्राट अशोकाच्या काळातही नाण्यांवर सूर्याचे प्रतीक चिन्ह असे. मगध जानपदाचे (नंतर साम्राज्याचे) शतकानुशतके ते प्रतीक चिन्ह राहिले. प्रत्येक जानपद त्या काळी विशिष्ट चिन्हांनी ओळखले जात असे. तशी सूर्यपूजा जगाला नवीन नाही. जीवनदायी सूर्य हा सर्वांनाच पूजनीय वाटणे स्वाभाविक आहे. अहूर (असूर) धर्माचेही प्रतीक सूर्यच असून इजिप्तमध्येसुद्धा ओसिरियस (सूर्यदेवता) या असूर निदर्शक शब्दाने एक देवता होती. असूर म्हणजे सूर्यदेवता. किंबहुना सूर्यालाच असिरियन असूर असे म्हणत. असूर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सूर्य देवताच दर्शवली जाते. भारतात मगध हे असूर संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. बिहारमध्ये पुरातन काळापासून सूर्यपूजा होती. ती येथे बाहेरून आयात झाली असे नसून पुरातन काळात असूर संस्कृती ही भारत ते इजिप्त अशी वेगवेगळ्या स्थानीय प्रारुपांत पसरली होती. बिहारमधील छटपूजा हा त्या संस्कृतीचाच अवशेष आहे.

Web Title: kolhapur chatpuja celebration