कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंडीत होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - येथील पंचगंगा व भोगावती नदीला महापूर आला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नदीमध्ये असणाऱ्या शिंगणापूर व नागदेववाडी येथील उपसा केंद्रात पाणी शिरले आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी साडेपाचच्या सुमारास शिंगणापूर उपसा केंद्रातून पाण्याचा उपसा बंद झाला आहे. आपटेनगर केंद्रासाठी केवळ तीन पंपच सुरू राहणार आहेत. बावड्यासाठीचा 1 पंप सुरू राहणार आहे. 

नागदेववाडी उपसा केंद्राच्या दरवाजाजवळ पुराचे पाणी आल्याने पहाटेपासून येथील उपसा बंद झाला आहे. यामुळे बालिंगा येथील केंद्रात तीन ऐवजी फक्त दोनच पंप चालु राहणार आहेत. अशा परिस्थितीमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर ताण येणार असून अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur city may face water supply disruption