#KolhapurFloods पुरग्रस्तांना मदत करू इच्छिता, मग योग्य नियोजनासाठी बैठकीस या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी, सेवाभावी संस्था धावून आल्या आहेत. परंतु प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत पोहोचवत आहे. ही मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी त्याचे योग्य नियोजन व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ही बैठक होणार आहे.

कोल्हापूर - पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी, सेवाभावी संस्था धावून आल्या आहेत. परंतु प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत पोहोचवत आहे. ही मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी त्याचे योग्य नियोजन व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ही बैठक होणार आहे.

पुरग्रस्तांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मदतीचे वाटप होणे गरजेचे आहे. यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता योग्य नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. तरी या बैठकीस सर्व स्वयंसेवी संस्थां, तसेच पुरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या संस्था यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Collector declares meeting