कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवड लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - काँग्रेसचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या छाननी समितीत व्यस्त असल्याने कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीचा निर्णय आज लांबणीवर पडला. उद्या किंवा सोमवारी यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सद्यस्थितीत विधानसभा निवडणुकीपर्यंत या पदावर प्रभारीच अध्यक्ष निवड केली जाईल.

काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी जिल्हाध्यक्ष पदासह काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन कुटुंबियांसह काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता होती. सद्यस्थिती आमदार सतेज पाटील यांचे नांव आघाडीवर आहे. तरुण नेतृत्त्व, जिल्हाभर पसरलेले कार्यकर्त्यांचे जाळे, हाताखाली असलेली मोठी यंत्रणा आणि मजबूत अर्थिक ताकद या जोरावर तेच या पदाचे प्रमुख दावेदार समजले जातात. आज श्री. पाटील यांच्या नावाची घोषणा होणार होती पण ती झाली नाही. 

सद्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघनिहाय उमेदवारांची छाननी प्रदेश पातळीवर सुरू आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे आज दिल्लीत होते. रात्री उशीरा ते मुंबईत परतल्याचे समजते. नेतेच राष्ट्रवादीसोबत आघाडी आणि उमदेवारांच्या छाननीत व्यस्त असल्याने यावर आज निर्णय होऊ शकलेला नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Congress District president selection postponed