कोल्हापूर पालिका नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने दणका दिला आहे. या सर्व नगरसेवकांचेपद रद्द केले आहे. यामध्ये माजी महापाैरांचाही समावेश आहे.

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेले नगरसेवक असे - माजी महापौर हसीना फरास (राष्ट्रवादी), संदीप नेजदार ( काँग्रेस),  नियाज खान (गटनेता शिवसेना), ​किरण शिराळे (ताराराणी आघाडी), सुभाष बुचडे (काँग्रेस), शमा मुल्ला (राष्ट्रवादी), वृषाली कदम (काँग्रेस), कमलाकर भोपळे (भाजप), सचिन पाटील (राष्ट्रवादी), संतोष गायकवाड (भाजप), विजय खाडे (भाजप), अफजल पिरजादे (राष्ट्रवादी), दीपा मगदूम (काँग्रेस), माजी महापौर स्वाती यवलुजे (काँग्रेस), अश्विनी बारामते (भाजप), सविता घोरपडे (भाजप), रीना कांबळे (काँग्रेस), मनीषा कुंभार (भाजप)

Web Title: Kolhapur Corporation 20 corporates post cancelled