कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय नको

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील ः 118 संवदेनशील गावांत कडेकोट बंदोबस्त

विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील ः 118 संवदेनशील गावांत कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूरः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय करू नका, असे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांना दिले. कोल्हापूर जिल्ह्यात 118 गावे संवेदनशील असून, तेथे कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाईपासून हद्दपारीपर्यंतच्या कारवाई केल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले, ""कोल्हापूर परिक्षेत्रात 558 गावे संवेदनशील आहेत. त्यात जिल्ह्यातील 118 गावांचा समावेश आहे. बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात 25 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. मतमोजणीनंतरही एक दिवस हा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

बंदोबस्तासाठी 892 वाहने व 283 वॉकीटॉकीही दिली आहेत. संपूर्ण परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी 13 हजार 430 गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 270 गुंडांना हद्दपार केले आहे. पोलिस अधीक्षकांपासून ते पोलिस निरीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांबाबत गावपातळीवर बैठका घेऊन शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. यात्रीनिवास, हॉलसह हॉटेलस्‌वरही पोलिसांची करडी नजर आहे. निवडणूक काळात कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्यांची गय केली जाणार नाही.''

परिक्षेत्रातील संवेदनशील गावे ः
कोल्हापूर ः 118
सांगली ः 40
सातारा ः 114
सोलापूर ग्रामीण ः 66
पुणे ग्रामीण ः 590

निवडणुकीसाठी बंदोबस्त
- पोलिस अधीक्षक - 5
अपर पोलिस अधीक्षक - 7
पोलिस उपाधीक्षक - 60
पोलिस निरीक्षक - 114
सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक - 753
पोलिस कर्मचारी - 16109
राज्य राखीव दलाच्या तुकड्या - 15
(प्रत्येक तुकडीत 125 पोलिस)
होमगार्ड - 6327

जिल्ह्यातील बंदोबस्त
- पोलिस अधीक्षक - 1
- अपर पोलिस अधीक्षक - 2
- पोलिस उपाधीक्षक - 13
- पोलिस निरीक्षक - 18
- सहायक व पोलिस उपनिरीक्षक - 130
- पोलिस कर्मचारी - 3042
- राज्य राखीव दलाची तुकडी - 4
- होमगार्ड - 682

जिल्ह्यातील संवेदनशील गावे ः
- करवीर तालुका ः वडणगे, निगवे दुमाला, वाकरे, सडोली खालसा, माळ्याची शिरोली, कसबा बीड, गांधीनगर, चिंचवडे.
- राधानगरी ः सरवडे, कसबा वाळवे.
- शाहूवाडी ः शाहूवाडी, कडवे, भेडसगाव, सरुड, बांबवडे, साळशी, पिशवी
- भुदरगड ः मुधाळ, म्हसवे, कडगाव, गंगापूर.
- चंदगड ः चंदगड, नागनवाडी, हलकर्णी, राजगोळी, गवसे
- पन्हाळा ः पन्हाळा, कळे, कोडोली, आसुले-पोर्ले, यवलूज, बाजार भोगाव, पुनाळ, काडोली, आरळे, सातवे.
- गगनबावडा ः गगनबावडा, असळज, तिसंगी
- शिरोळ ः शिरोळ, कुरुंदवाड, औरवाड, यड्राव.
- हातकणंगले ः हातकणंगले, वडगाव, इचलकरंजी, शहापूर, हुपरी, रुकडी, अतिग्रे, भादोले, पारगाव, कबनूर, कोरोची, पट्टणकोडोली.
- आजरा ः आजरा, उत्तूर, किणे.
- कागल ः मुरगूड, कागल, यमगे, हमिदवाडा, लिंगनूर, पिंपळगाव खुर्द, निढोरी, सेनापती कापशी, कसबा सांगाव, व्हनाळी, म्हाकवे, बेलवळे बुद्रुक, साके, बाचणी.

Web Title: kolhapur election and vishwas nangare patil