#KolhapurFlood सुरक्षितस्थळी 51 हजार नागरिकांचे स्थलांतरण 

#KolhapurFlood सुरक्षितस्थळी 51 हजार नागरिकांचे स्थलांतरण 

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली. आत्त्पार्यंत जिल्ह्यातील 204 गावांमधील 11 हजार 432 कुटुंबातील 51 हजार जणांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले आहे. 18 गावांना पुराचा वेढा पडला असून त्यांचा संपर्क तुटला आहे. या गावातील नागरिकांना प्राधान्याने बाहेर काढून सुरक्षीतस्थळी नेण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सक्रिय झाली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. 

राधानगरीचे दोन दरवाजे बंद झाले असले तरी कोयनेतून सोडलेले पाणी कृष्णानदीत आल्याने पंचगंगेचे पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. हे पाणी पाठीमागे पसरत असल्याने पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यातच पावसाने अद्याप पूर्ण उघडीप न दिल्याने साचलेले पाणी तसेच आहे. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.

आत्तापर्यंत 204 गावातील 11 हजार 432 कुटुंबातील 51 हजार जणांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले आहे. बचाव कार्यासाठी आर्मीचे 160 जवान आले आहेत. एन.डी.आर.एफचे 40 जवान बचाव कार्यात सक्रिय आहेत. नैदलाचे 15 जवानही मदतीसाठी आले आहेत. दोन हॅलिकॉप्टर दाखल झाली असून अजून तीन हॅलीकॉप्टर मुंबई आणि गोव्यातून संध्याकाळ पर्यंत येणार आहेत. नौदलाच्या 2 बोटी आल्या असून अजूनही मागवण्यात आल्या आहेत. 

शहरातील 3 हजार नागरिकांचे स्थलांतर 
शहराच्या उत्तर बाजूला पुराचा फटका बसला असून खानविकर पंपापर्यंतच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे तेथील लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप 3 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

मदत कार्यात सापांचा अडथळा 
पुराचे पाणी शहरात आले. आसपासच्या ओढ्या नाल्याचे पाणीही त्या भागात पसरले आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात बरेच ठिकाणी सापांचे दर्शन होते. काही घरातही साप आले असून मदत कार्यात त्यांचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. 

#helpkolhapur 
ज्यांना मदत हवी असले त्यांनी पोस्ट करताना आणि सर्च करताना या हॅश टॅगचा वापर करावा. या ठिकाणी आपतकालीन मदतीचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com