#KolhapurFlood  कोवाड येथील पुरग्रस्तांच्या एअर लिफ्टींगसाठी समन्वय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. हे काम नौदल, लष्कर, एमडीआरएफ आणि कोस्टगार्ड यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरु आहे. चंदगड तालुक्‍यातील कोवाड येथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअर लिफ्टींगबाबत समन्वय सुरु आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

श्री. पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आज कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी केली. सातारा, कागल महामार्ग क्रमांक 4 वर आलेल्या पाण्याची पाहणी करुन, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी महावीर महाविद्यालय येथील रेस्क्‍यू ऑपरेशन, छत्रपती शाहू विद्यालयातील पूरग्रस्त शिबिराला भेट देवून त्यांची विचारपूस केली. याठिकाणी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, 55 बोटी सध्या जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम करीत आहेत. अभूतपूर्व अशी ही परिस्थिती पावसामुळे झाली आहे. पाऊस थांबत नाही तोपर्यंत आपल्या मर्यादा आहेत. तरीही सर्व आपत्कालीन यंत्रणा फिल्डवर कार्यरत आहेत. शिबिरात आणल्यानंतर त्यांना जेवण पुरवणं आणि औषधोपचार करणं हे महत्त्वाचं काम सुरु आहे. 

युद्धपातळीवर मदत कार्य सुरु आहे पण पडणाऱ्या पावसामुळे पाणी पातळी कमी होत नाही. कर्नाटक राज्याच्याही विसर्ग सोडण्याबाबत अडचणी आहेत. तरीही सर्व यंत्रणांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार संजय मंडलीक, आमदार अमल महाडिक, पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Coordinate for air lifting at Kovad