#KolhapurFlood पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प असल्यामुळे शुद्ध पाणी घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा पाण्यात बुडाल्यामुळे गेले तीन दिवस कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे.‌

शहरात अनेक ठिकाणी वीज खंडित झाल्यामुळे कूपनलिकेचे पाणीही उपलब्ध करण्यावर मर्यादा येत आहेत. सुभाष नगराता शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एटीएमवर ग्राहकांनी कॅन, बादली, घागर घेऊन रांगा लावल्या आहेत. शहरातील अनेक कुटुंबांनी पावसाचे पावळनीतून येणारे पाणी साठवून त्याचा वापर करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Huge line for drinking water