#KolhapurFlood खिद्रापूरमधील दोन हजार ग्रामस्थांचे स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कुरुंदवाड - खिद्रापूरमधील दोन हजार ग्रामस्थांचे आजअखेर स्थलांतर करण्यात आले. तर जुने दानवाडमध्ये फक्त 25 ग्रामस्थच गावात आहेत. "कृष्णा', "पंचगंगे'ला आलेल्या पुरामुळे राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूरसह जुने दानवाड व बस्तवाडमधील पूरपरिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाण्याची पातळी कधी कमी होते, याकडे नदीकाठावरील हजारो लोकांचे डोळे लागले आहेत. 

मंगळवारी (ता. 6) रात्री जोरदार पाऊस झाला. आज दिवसभरात पाण्याच्या पातळीत दोन फुटाने वाढ झाल्याने पूरग्रस्ताच्या चिंतेत भर पडली. कुरुंदवाडसह पंचगंगा काठावरील गावागावांतही पूरपरिस्थिती गंभीर झाल्याचे चित्र आहे.

कुरूंदवाडचेही झाले बेट

कुरुंदवाडलाही पाण्याने वेढा घातला असून पालिका चौक बाजारपेठ, भालचंद्र टॉकीज, पोलिस ठाणे परिसरात पाणी आले आहे. जवळपास 45 टक्के नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून शेकडो एकरातील पीके पाण्याखाली गेली आहेत. कुरुंदवाडला जोडणारा मजरेवाडी हा एकमेव रस्ता आज पाण्याखाली गेल्याने कुरुंदवाडलाही बेटाचे स्वरुप आले.

बस्तवाडलाही पाण्याचा वेढा पडला असून चार दिवसांपासून ग्रामस्थ स्थलांतर करत आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक आर. आय. कोळी, इर्शाद पाटील, जे. डी. चव्हाण हे तरुण मंडळांच्या सोबत नागरिकांना मदत करत आहेत. आज यांत्रिक बोट उपलब्ध करुन देण्यात आली. 

राजापूरची अवस्था अगदीच बिकट बनली आहे.  50 टक्के लोक गावातच आहेत. गाव चारही बाजूनी पाण्यानी वेढले असून केवळ 100 घरातच लोक राहिले आहेत. मराठी शाळा ऊर्दू शाळामध्ये लोकांची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे.

नवे दानवाडमध्ये केवळ 25 लोक आहेत. नवे दानवाड गावाला दुधगंगा नदीच्या पाण्याचा घट्ट वेढा बसल्यानंतर हळूहळू संपूर्ण गावच स्थलांतरीत झाले आहे. गावात केवळ 25 लोकच शिल्लक राहिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood migration of 2000 villagers from Khidrapur