#KolhapurFlood महापालिकेतर्फे 3 हजार 453 व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेतर्फे एकूण 889 कुटुंबातील 3 हजार 453 व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. 107 पाळीव प्राणी आणि जनावरे यांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफकडून आणखी 4 तर नौसेनेकडून आणखी 1 बोट मदत कार्यासाठी आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आढावा घेतला.आवश्‍यकता आहे तिथे मुंबईतून वैद्यकीय पथक पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोल्हापूर शहरातील 16 बाधित ठिकाणाहून या कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यापैकी 545 कुटुंबे स्वत:हून नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाली आहेत. चार ठिकाणावरून 107 पाळीव प्राणी आणि जनावरे यांचेही स्थलांतर केले आहे. नौसेनेच्या तिसऱ्या विमानाने आणखी 1 बोट तर एनडीआरएफच्या आणखी 4 बोटी मदत कार्यासाठी आल्या आहेत. यापैकी 3 बोटी शिरोळ तालुक्‍यासाठी, 1 बोट इचलकरंजी -हातकणंगले परिसरासाठी व 1 शहरासाठी पाठविण्यात आली आहे. पुण्यावरून नौसेनेच्या आणखी बोटी दाखल होणार आहेत. संध्याकाळपर्यंत पूर परिस्थिती नियंत्रणात असेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्यक्त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Municipal Corporation re secure 3,453 people