#KolhapurFloods विशाखापट्टणमहून नौदलाचे पथक आज शिरोळमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

शिरोळ  -  विशाखापट्टणमधून नौदलाचे 15 जणांचे पथक बोटीसह शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी आज दुपारपर्यंत दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

शिरोळ  -  विशाखापट्टणमधून नौदलाचे 15 जणांचे पथक बोटीसह शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी आज दुपारपर्यंत दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पंचगंगा नदीची पातळी सुमारे साडेतीन फूटांपेक्षा जास्त प्रमाणात कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले. शिरोळमधील गावांसाठी
एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, तटरक्षकदलाच्या एकूण 45 बोटी आणि पथकांसह पूरग्रस्तांसाठी मदत पोहचवत आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी काल नौदलाच्या अतिरिक्त बोटीसाठी पथकाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी केंद्रशासनाशी संवाद साधून ही अतिरिक्त मदत मिळविली
असून, त्यानुसार आज दुपारपर्यंत विशाखापट्टणम येथून नौदलाच्या अतिरिक्त 15 जणांचे पथक बोटीसह दाखल होत आहे. अलमपट्टीमधूनही विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे,

दरम्यान पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथून कोल्हापूरला सिलेंडर गॅस व औषधे आपत्कालीन बोट मधून पाठवण्यात आली. तसेच कोल्हापूरातून शिरोळला पाठवण्यासाठी अतिसार व रोगप्रतिबंधक औषध आणली आहेत.
जिल्हयात पूरस्थिती गंभीर असून, राष्ट्रीय महामार्गावर पाणी असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. शिरोळ भागात अतिसार, गस्ट्रो, ताप यासाठीची औषधांची गरज आहे. ही औषधे कोल्हापूरातुन बोटीने सांगली फाटा येथे आणली. तेथून ती विशेष वाहनाने शिरोळला पाठवली.

कोल्हापूरला लेप्टोस्पायरसी साथीच्या आजारासाठी आवश्यक डोक्सी सायकलीनच्या गोळ्या व पाणी शुध्दीकरणाच्या मिडीक्लोरची औषधे आपत्कालीन बोटीतून पाठवण्यात आली. एका बोटीतून दहा ते बारा सिलेंडर जातात. ही सर्व सिलेंडर कोल्हापूरातील कॅम्पमध्ये दिली जाणार आहेत.

आज एनडीआरएफच्या तीन बोटी शिरोळला पाठवण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर ते सांगली फाटा येथे आपत्कालीनच्या दोन बोट असून, त्यातून जीवनावश्यक वस्तूची वाहतूक सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood Navi squad from Visakhapatnam to Shirola today