कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते रस्ते सुरू? कोणते बंद? जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुरस्थिती हळूहळू ओसरत आहे. अद्यापही जिल्ह्यातील 101 बंधाऱ्यावर पाणी आहे. त्यामुळे जिल्ह्या अंतर्गत अनेक रस्ते बंद आहेत. तर काही रस्ते सुरू झाले आहेत.

 

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुरस्थिती हळूहळू ओसरत आहे. अद्यापही जिल्ह्यातील 101 बंधाऱ्यावर पाणी आहे. त्यामुळे जिल्ह्या अंतर्गत अनेक रस्ते बंद आहेत. तर काही रस्ते सुरू झाले आहेत.

सायंकाळी चार वाजता पुराची व वाहतुकीतीची स्थिती 

राधानगरी धरण 
सध्यस्थिती राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे चालु असुन त्यामधुन ५००० क्युसेक पाण्याचा विसर्ग चालु आहे.

काळम्मावाडी धरण
काळम्मावाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद केले असून पाण्याचा विसर्ग बंद आहे.

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४
१. कोगनोळी महाराष्ट्र प्रेवशाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर दुधगंगा नदीचे रस्त्यावर तीन फुट पाणी आहे

२. सांगली फाटा ते पंचगंगा पुल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीचे साडेतीन फुट पाणी आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग कं.४ वरील वाहतुक पुर्णपणे बंद आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६

आंबेवाडी व केर्ली या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पुराचे | पाणी असल्याने शिवाजी पुल ते रत्नागिरी कडे जाणारी वाहतुक बंद आहे.

गगनबावडा राज्यमार्ग क्रमांक 115

या राज्यमहामार्गावरील कळे व लोंघे या गावाजवळ राज्यमार्गावर पुराचे पाणी असल्याने वाहतुक पुर्ण बंद आहे.

कोल्हापूर - परिते - राधानगरी राज्यमार्ग

या राज्यमहामार्गावरील हळदी या गावाजवळ पुराचे पाणी असल्याने कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाणारी वाहतुक बंद आहे.

उत्तुर - आजरा - आंबोली राज्यमार्ग

उत्तुर ते आजरा यामार्गावरील व्हिक्टोरीया पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  पण आंबोली धबधब्याजवळ (सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीमध्ये) दरड कोसळयाने आजरा ते आंबोली जाणारी वाहतुक बंद आहे. 

निपाणी - कणकवली राज्यमार्ग

या राज्यमहामार्गावरील निढोरी या गावाजवळ राज्यमार्गावर रस्त्याचे पाणी असल्याने वाहतुक बंद आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood which road open which close report