#KolhapurFlood आणखी दोन दिवस पेट्रोल डिझेल मिळणार नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - जिल्ह्यातील 252 पेट्रोल पंपावरील सर्व साठा संपला आहे. जिल्ह्याला रोज सुमारे पाच लाख लिटर पेट्रोल डिझेल आवश्यक असते. काही पेट्रोल पंप पुराच्या पाण्यात बुडाल्याने ते बंद आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखीन दोन तीन दिवस पेट्रोल - डिझेल मिळणे अशक्य आहे, अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार मानगावे यांनी दिली.

पूर परिस्थितीमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. परिणामी गेल्या दोन दिवसात पेट्रोल - डिझेलचा एकही टॅंकर कोल्हापूर शहरात येऊ शकला नाही. अशीच अवस्था जयसिंगपूर हातकणंगले परिसरात आहे.  उदगावजवळ आलेल्या पुराच्या पाण्यामुळे त्या परिसरात एकही पेट्रोल - डिझेलचा टँकर पोहोचू शकला नाही. पेट्रोल डिझेलची टंचाई होईल म्हणून अनेक ग्राहकांनी वाहनांच्या पेट्रोल - डिझेलच्या टाक्या फुल करून घेतल्या आहेत.  

पोलिस पंपावर केवळ शासनाच्याच वाहनांना पेट्रोल

कसबा बावडा येथे पोलिसांचा सुरू झालेल्या पेट्रोल पंपावर आज वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती, पण आपत्कालीन स्थितीत फक्त शासनाच्याच वाहनांना पेटवून दिले जाईल,  अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शासकीय वाहनांना, बोटींना इंधनाची आवश्यकता आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods Only petrol to the administration at the police petrol pump