#KolhapurFloods पन्हाळा तालुक्‍यात सहाशेवर कुटुंबांचे स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पन्हाळा - तालुक्‍यात सर्वत्र्‌ अतिव्रुष्टी असून कासारी, कुंभी, जांभळी, वारणा नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातल्याने जनजीवन विस्कळित झाले. पुराचा तडाखा बसलेल्या तसेच घरांची दुरावस्था झालेल्या एकूण 628 कुटुंबांची प्रशासनाने प्राथमिक शाळेत, गावच्या सार्वजनिक हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली असून प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 लिटर रॉकेल असे धान्याचे वाटप केले आहे.

पन्हाळा - तालुक्‍यात सर्वत्र्‌ अतिव्रुष्टी असून कासारी, कुंभी, जांभळी, वारणा नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातल्याने जनजीवन विस्कळित झाले. पुराचा तडाखा बसलेल्या तसेच घरांची दुरावस्था झालेल्या एकूण 628 कुटुंबांची प्रशासनाने प्राथमिक शाळेत, गावच्या सार्वजनिक हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली असून प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 लिटर रॉकेल असे धान्याचे वाटप केले आहे. कासारीमुळे बाजारभोंगाव आणि माजनाळ येथील तर वारणा नदीमुळे काखे गावातील लोकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन केलेल्या 628 कुटुंबात 1285 पुरूष, 1194 महिला तर 463 बालके अशा 2942 लोकांचा समावेश आहे. 

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील 28 गावांना पुराचा अधिक धोका असल्याने तहसीलदार रमेश शेंडगे यांनी कळे, बाजार भोगाव परिसरात एका बोटीसह आपत्कालिन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या यंत्रणेने काल रात्री मल्हारपेठ येथील गर्भवतीला कळे येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. पुढील शस्त्रक्रियेसाठी अनेकांची मदत घेत पुरातून वाट काढत कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल केले. पन्हाळा रस्ता बुधवार पेठेपासून प्रवासीकर नाक्‍यापर्यंत खचल्याने तसेच याच मार्गावर दरडीचे मोठ मोठे दगड कोसळू लागल्याने गुरुवारपेठेतील कुटुंबाना स्थलांतरीत करण्याचा आदेश तहसिलदारांनी दिला पण काही लोक अजुनही इथे मुक्‍काम करून आहेत. 

तालुक्‍यात आजअखेर सरासरी 1806 मिमि पाउस पडला असून हा पाउस दरवर्षीच्या सरासरीपेक्षा जादा असल्याने आणि सलग 5 दिवस अतिव्रुष्टी चालू असल्याने घरे पडून तसेच पीके पाण्याखाली जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पन्हाळ्याचा रस्ताच बंद 

रस्तेच बंद असल्याने दूध संकलनही बंद झाल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान चालू आहे. पन्हाळयात तर बुधवारपेठेचा, मंगळवारपेठेचा रस्ता खचल्याने गडावर यायला जायला वाटच नाही. पोलिसांनी नाक्‍याजवळ तसेच बुधवार पेठेत बॅरिकेटस लावून तसेच कर्मचारी ठेवून रस्त्यावर यायला मनाई केली आहे, तर राक्षी फाट्यावरून संजीवनकडे येणारा रस्ता निकमवाडी जवळ खचल्याने तीन दरवाजातील दुचाकीचा रस्ताही बंद होण्याची शक्‍यता आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods Panhala Taluka Rescue operation report