#KolhapurFloods पहेनने के लिए कपडा भी नहीं... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कोल्हापूर  -  ""पूर आया और पुरा पाणी घर में घुसा, सारा सामान पाणी में बह गया, कुछ नही रहा, अब हमारे पास पहेनने के लिए एक कपडा भी नहीं रहा...'' अशा शब्दांत विश्‍वभारती कॉलनीतील रमेजा शेख यांनी पूर परिस्थितीतील व्यथा सांगितली. त्यांची दोन्ही मुले महाव्दार रोडवर कपडे विकतात. कपड्यांचा व्यवसाय असूनही घालायला कपडे नसल्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला आहे. 

मंगळवारी रात्री अचानक लाईट गेली. लाईट का गेली म्हणून रमेजा उठल्या. पाहतात तर घराच्या उंबऱ्यातून पाणी आत आलेले. या पाण्याला वेगही खूप होता. जीवाच्या आकांताने मुले, सुना, नातवंडासोबत बाहेर पडल्या. अंधारात मिळेल ते साहित्य उचलले आणि सुरक्षित ठिकाणी आल्या. परंतु, हा धक्का त्यांना सहन झाला नाही. आजारी पडल्या. त्यामुळे दवाखान्यात दाखल करावे लागले. इकडे घराला पुराने वेढा दिला. या पाण्यासोबत घरातील साहित्य वाहून गेले. अंथरूण, कपडे, धान्य सगळं काही या पुराने नेलं. 

लोकांनी दिलेली कपडे वापरायला सुरवात केली आहे. या परिसरात कोणीही मदतीसाठी गेलेले नाही. त्यामुळे आता नातवंडांना खायला काय द्यायचं? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. संसार पुन्हा कसा उभा करायचा? हा प्रश्‍न समोर असतानाही त्या थांबलेल्या नाहीत. मुलांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला आहे. वाहून गेलेला संसार पुन्हा उभा करायचा या एकाच विचाराने कुटुंब पुन्हा उभे राहिले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods special story of suffers