#KolhapurFloods  अडीच लाख पूरग्रस्तांनाचे तर सुमारे ५० हजार जनावरांनाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

#KolhapurFloods  अडीच लाख पूरग्रस्तांनाचे तर सुमारे ५० हजार जनावरांनाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

कोल्हापूर  - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराची अभूतपूर्व स्थिती उद्भवली असतांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी लष्कर, नौदल, एनडीआरएफ तुकड्या, प्रशासन आणि स्वयंसेवी –सामाजिक संस्था यांनी हातात हात घेऊन दिवस रात्र बचाव कार्य सुरु ठेवले आहे. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांत मिळून आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जवळपास ५० हजार पाळीव प्राणी, जनावरांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 239 गावे व सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 90 गावे अशी 12 तालुक्यातील 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. विविध 270 ठिकाणी उभारण्यात तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांची  व्यवस्था करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य

जिल्हा प्रशासनाबरोबरच ओडिसा, पंजाब व गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये 2 तर कोल्हापुरात १ अशी तीन पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 तर सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.

२४ तास आरोग्य सेवा

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी देखील प्रशासनाने घेतली असून महानगरपालीकेच्या आरोग्य यंत्रणेशिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने  विशेष वैद्यकीय पथके तैनात करुन पूरग्रस्तांपर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.कोल्हापूरमध्ये ११६ अशी पथके २४ तास कार्यरत आहेत. पूरग्रस्त गावांतील 191 गरोदर मातांना विशेष काळजी घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले असून त्यानं औषधोपचार करण्यात येत आहे.

स्थलांतराला वेग

सांगलीत सुमारे 26 हजार 593 कुटुंबांतील 1 लाख 34 हजार 363 लोक व 30 हजार 692 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केले आहे.  मिरज तालुक्यातील 20  गावांतील 4  हजार 134  कुटुंबांतील 21 हजार 884 लोक व  6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

पलूस तालुक्यातील 22 गावांतील 5 हजार 328 कुटुंबांतील 25 हजार 245 लोक व 6  हजार 196  जनावरे   यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 36  गावांतील 12  हजार 215 कुटुंबांतील 65 हजार 383 लोक  व 15 हजार 117 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.  शिराळा तालुक्यातील  20 गावांतील 500 कुटुंबांतील 2 हजार 273 लोक व 2 हजार  590 जनावरे  यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील  4 हजार 416   कुटुंबांतील   19 हजार   578  लोक व 455 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. 

 कोल्हापूर मधील स्थलांतर करण्यात आलेल्या लोकांची संख्या पुढीलप्रमाणे :

कागल - 25 गावातील 1 हजार 73 कुटुंबातील 5 हजार 542 सदस्य, 

राधानगरी –17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, 

गडहिंग्लज –15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, 

आजरा–22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, 

भुदरगड –14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, 

शाहुवाडी –6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, 

पन्हाळा –28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, 

शिरोळ –42 गावातील 8 हजार 211 कुटुंबातील 39 हजार 550 सदस्य, 

हातकणंगले –21 गावातील 4 हजार 484 कुटुंबातील 21 हजार 122 सदस्य, 

करवीर –35 गावातील 5 हजार 40 कुटुंबातील 23 हजार 317 सदस्य, 

गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com