दोन दिवसांत आणखी एका "राजकीय धक्का'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

जयसिंगपूर - कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात धक्का देणारी आणखी एक घटना येत्या दोन दिवसांत घडेल, असे संकेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी रात्री जयसिंगपूर येथील ताराराणी आघाडीच्या प्रचार सभेत दिला.

देशभक्त स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या सौ. रजनीताई मगदूम यांनी याच कार्यक्रमात कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर मंत्री पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला. भाजपमध्ये प्रवेश करणारी "ती' व्यक्ती कोण? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी रात्री ताराराणी आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना मंत्री पाटील यांच्या या वक्तव्याने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्‍यांत हरितक्रांती घडवून कॉंग्रेसला भक्कम पाठबळ दिलेल्या स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या सौ. रजनीताई मगदूम यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

रत्नाप्पाण्णा कुंभार कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. कोल्हापूर जिल्ह्याची कॉंग्रेस बळकट करताना त्यांनी विविध खात्यांचे मंत्री, आमदार म्हणूनही उल्लेखनीय अशी कामगिरी बजावली आहे. त्यांनी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी आजही त्यांच्या विचाराने वाटचाल करत आहे. त्यांच्यानंतर कन्या सौ. मगदूम यांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याचा प्रयत्न केला.

शिरोळ विधासभेसाठी त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी देण्यात आली. पण, राजू शेट्टी यांचा विजय झाल्यानंतर मात्र, त्यांनी काहीसे राजकारणाकडे दुर्लक्ष केले. मात्र, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचेच बोलले जात आहे.

दरम्यान, मंत्री पाटील यांनी येत्या दोन दिवसांत जिल्ह्याच्या राजकारणात भूंकप घडविणारी घटना घडण्याचे संकेत दिल्याने आता कोण भाजपच्या वाटेवर आहे? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Web Title: kolhapur to get political shock