कोल्हापूर महापाैर निवडणूकीवेळी शिवसेनेचे चार नगरसेवक गैरहजर 

डॅनिअल काळे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

कोल्हापूर -  शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी महापौर निवडीच्या या सभेला गैरहजर राहणेच पसंत केले. शिवसेनेच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते.पण हे नगरसेवकच गैरहजर राहील्याने दोन्ही कॉग्रेसला याचा फायदा झाला. 

कोल्हापूर महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. 2015 पासून शिवसेनेने महापालिकेच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे. ते भाजपसोबत गेले नव्हते. आजच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना त्यांचा नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत जाणार का?यावरुन तर्कवितर्क लढविले जात होते.

आता महापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून सरिता मोरे यांचे नाव येताच पुन्हा शिवसेनेची भुमिका काय असेल,हा कुतूहलाचा विषय होता.भाजप शिवसेनेचे गुण जुळवून निवडणुकीत वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा ताराराणी आघाडीकडून सुरु होता.पण त्याला यश आले नाही.शिवसेनेच्या नगरसेवकांना घेउन आमदार राजेश क्षीरसागर हे देखील सहलीवर गेले होते. त्यांच्यासोबत तीन नगरसेवक होते. चौथे नगरसेवक अभिजीत चव्हाण यांचे दोन दिवसांनी लग्न असल्याने ते सहलीवर गेले नाहीत. निवडीच्या सभेसाठी मात्र शिवसेनेचा कोणताच नगरसेवकाने सभेला उपस्थिती लावली नाही. 

ते पाचही नगरसेवक आजच्या सभेला पात्र 
जात वैधता प्रमापत्र उशीरा सादर करणाऱ्या त्या पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश महापौर निवडीच्या सभेपर्यंत आलाच नसल्याने ते पाचही नगरसेवक आज पात्र राहीले. यामध्ये कॉग्रेसचे संदीप नेजदार, दिपा मगदूम, वृषाली कदम, राष्ट्रवादी कॉग्रेसचे सचिन पाटील आणि भाजपचे संतोष गायकवाड यांचा समावेश होता. निवडीच्या सभेपर्यंत केंव्हाही आदेश धडकेल, अशी शक्‍यता होती.पण हा आदेश कांही आला नसल्याने ते पाचही नगरसेवक सभेला पात्र ठरले.

Web Title: Kolhapur Mayor Election