मुंबई - कोल्हापूर विमान सेवा 'या' कालावधीत राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

कोल्हापूरातून इंडीगो कंपनीची विमान सेवा सुरू होऊन एक वर्ष झाले यात कोल्हापूर - हैदराबाद- तिरूपती या मार्गावर प्रवासी सेवा चांगली व प्रतिसादही चांगला आहे. मात्र ही सेवा वगळता कोल्हापूर - मुंबईही विमान सेवा आठवड्यात पाच वेळा आहे

कोल्हापूर - येथून कोल्हापूर - हैदराबाद - तिरूपती विमानसेवा रोजची सुरू झाली. त्याला प्रवासी प्रतिसाद व सेवा चांगला आहे. मात्र कोल्हापूर - मुंबई विमानासाठी नाईट लॅण्डींग सुविधेपासून ते विमानांचे वेळापत्रक संभाळण्याची कसरत होत आहे. यासाठी ही सेवा येत्या 7 ते 27 डिसेंबर याकाळात बंद रहणार आहे. या सेवेत ऐनवेळी विमान फेरी रद्द होणे किंवा फेऱ्यांना उशिरा होणे त्याची माहिती प्रवाशांना न मिळणे, अशा अनेक तांत्रिक उणिवा गेल्या सहा महिन्यांपासून "जैसे थे' आहेत. त्या दूर करण्यासाठी विमान सेवांची तांत्रीक माहिती घेऊन ठोस पाठपुरावा करावा लागणार आहे. 

कोल्हापूरातून इंडीगो कंपनीची विमान सेवा सुरू होऊन एक वर्ष झाले यात कोल्हापूर - हैदराबाद- तिरूपती या मार्गावर प्रवासी सेवा चांगली व प्रतिसादही चांगला आहे. मात्र ही सेवा वगळता कोल्हापूर - मुंबईही विमान सेवा आठवड्यात पाच वेळा आहे, ही सेवा सुरू करण्यासाठी सलग दिड वर्षे पाठपुरावा करावा लागला तेव्हा खासदार धनंजय महाडीक यांनी विमानसेवा विषयातील संबधीत घटकांकडून माहिती घेत सतत पाठपुरावा केला अखेर कोल्हापूर - मुंबई - विमानसेवा दक्षिण भारतातील एक खासगी "ट्रूजेट' या कंपनी चालवते, मात्र त्याविमान सेवेत वेळीची अनिश्‍चितता काही वेळा होते.

हेही वाचा - शिरोळ तहसिलदारांच्या नेतृत्वात धडक कारवाई; कोणती ते वाचा... 

नाईट लॅण्डींगची अडचण दुर होण्याची गरज

अहमदाबादमधून निघणारे विमान जळगाव, नांदेड अशी विविध शहरे करीत कोल्हापूर - मुंबई मार्गावर येते. यात एका ठिकाणी विमानास उशिर झाला तर पुढे सर्वत्र उशिर होतो. ही सर्वात मोठी या सेवेतील अडचण आहे. वास्तविक यामार्गावर विमान सेवेला प्रवासी प्रतिसाद वाढता आहे. तो अधिक वाढावा. यासाठी तांत्रिक सुविधा सक्षम कराव्या लागणार आहेत. यात नाईट लॅण्डींगची अडचण दुर करावी लागेल. त्यासाठी लागणारे तांत्रीक पर्याय, त्या विषयांतील तज्ञ व विमान उड्डाण खात्यांकडून लागणाऱ्या परवानग्यांची माहिती एकाच वेळी घेऊन त्यानुसार पाठपुरावा करावा लागेल. 

हेही वाचा - हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिआ वूल्फ मधून सुंदर खेळाची अनुभूती

या अडचणी सहा महिन्यापासून जैसे थे

हेच काम गेल्या पाच महिन्यात सक्षमपणे झाले नाही. या साऱ्यातून विमानसेवेविषयी ज्या अडचणी सहा महिन्यापूर्वी होत्या त्या आज तशाच आहेत. त्यातून जेवढी विमानसेवा मिळते त्यावर समाधान मागण्याची वेळ आली आहे.  अशात मागील आठवड्यात संध्याकाळ झाल्याने मुंबईचे विमान उडू शकले नाही. मात्र तातडीने उड्डान उभारण्यासाठी तांत्रीक सुविधा नसल्याचे सांगण्यात आले. महापूर काळात काही विमाने येथे उतरली आहेत. अशा अटीतटीच्या वेळी कोणते पयार्य वापरावेत हे सांगण्यासाठी सक्षम माणसं कोल्हापुरात नाहीत की असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. ही बाब विचारात घ्यावी लागत आहे. 

.या आहेत उणिवा

कोल्हापूर - अहमदाबाद मार्गावर सेवा सुरू होण्याचा विषय प्रलंबीत, नाईट लॉण्डींग सेवा सुरू होणे प्रलंबीत, विमान फेऱ्या वाढविण्याला मर्यादा, कोल्हापूर - मुंबई मार्गावर विमान सेवा उशिर होणार असल्यास प्रवाशांना पूर्व सुचना तत्काळ मिळत नाहीत इथपासून ते कॅन्टीन सुविधा सक्षम नाही अशा उणिवा आहेत. 

आणखी चांगल्याप्रकारे सेवा देता येणे शक्य

"कोल्हापूर - हैदराबाद - तिरूपती या मार्गावर कोल्हापूरातून प्रवासी प्रतिसाद चांगला आहे. विमान सेवेला पुरक ठरतील असा प्रवासी वर्गही येथे आहे. ज्या उपलब्ध सुविधा आहेत. त्यांचा वापर करून आम्ही या मार्गावर सेवा चांगली चालवत आहोत. उर्वरित तांत्रीक बाबी अधिक सक्षम झाल्यास आणखी चांगल्या प्रकारे सेवा देता येणे शक्‍य आहे.''  

- मोहन कटारिया, संचालक इंडीगो विमानसेवा कोल्हापूर विमानतळ

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Mumbai Air Service Close From 7 December