कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

एएआयच्या समितीकडून पाहणी : आमदार अमल महाडिकांनी घेतली भेट

कोल्हापूर, ता. 27 : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू करण्याची ग्वाही एएआयचे अधिकारी सुजॉय डे व एच. नंदकुमार यांनी दिल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

एएआयच्या समितीकडून पाहणी : आमदार अमल महाडिकांनी घेतली भेट

कोल्हापूर, ता. 27 : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू करण्याची ग्वाही एएआयचे अधिकारी सुजॉय डे व एच. नंदकुमार यांनी दिल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, 19 सप्टेंबरला विमान प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. प्राधीकरणचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑक्‍टोबरला दिल्लीत व्यापक बैठक झाली. त्यात 274 कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण केले होते. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विमानतळावर डे ऑपरेशन सुरू करण्याची मागणी केली होती. यावर अधिकारी कोल्हापूरला भेट देऊन कमी आसन क्षमतेची विमानसेवा सुरू करण्यासाठी टू बी लायसन्स देण्याविषयी पाहणी करतील, असे अश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे प्राधिकरणाचे अधिकारी कोल्हापुरात आले आहेत.

त्यांनी आज धावपट्टी आणि तांत्रिक सुविधांची पाहणी केली. या वेळी आमदार अमल महाडिक व विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ यांनी त्यांची भेट घेतली. पुढील आठवड्यात तांत्रिक समिती सर्वेक्षण करणार असून विमानतळासाठी आवश्‍यक असणारा टू बी परवाना मिळविण्यासाठी आवश्‍यक बाबींची तरतूद केली जाईल.

असे आमदार महाडिक यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कमी आसन क्षमतेची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ताबडतोब सुरू करून सुरवातीच्या काळात मुंबईतील जुहू इथल्या धावपट्टीवर विमान लॅंडिग करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षक भिंतीसाठी 16 कोटी मंजूर होऊन त्याची निविदा प्रक्रियाही झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांत कमी आसन क्षमतेची विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. या वेळी विमानतळ इन्चार्ज ए. रझाक उपस्थित होते.

 

Web Title: Kolhapur-Mumbai flight soon