कोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीची प्रक्रिया तीन प्रभागांत सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कोल्हापूर - महापालिका प्रशासनाने तीन प्रभागांत पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. आश्‍विनी रामाणे, अजिंक्‍य चव्हाण, अफजल पिरजादे यांच्या प्रभागांत निवडणूक होईल. जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने रामाणे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. चव्हाण व पिरजादे यांच्यावर पक्षांतरबंदीची कारवाई झाल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली आहे. 

कोल्हापूर - महापालिका प्रशासनाने तीन प्रभागांत पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. आश्‍विनी रामाणे, अजिंक्‍य चव्हाण, अफजल पिरजादे यांच्या प्रभागांत निवडणूक होईल. जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने रामाणे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. चव्हाण व पिरजादे यांच्यावर पक्षांतरबंदीची कारवाई झाल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली आहे. 

रामाणे या काँग्रेस तर पिरजादे व चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. पिरजादे यांनी विभागीय जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र त्यासंबंधी महापालिका प्रशासनाला पत्र मिळालेले नाही. चव्हाण हे अद्याप न्यायालयात गेलेले नाहीत.

रामाणे यांचे जात वैधता प्रमाणपत्र न्यायालयाने रद्दबातल केल्याने आयुक्तांनी त्यांचे नगरसेवक पद्द केले होते. रामाणे यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर स्थगिती आदेश मिळाली होता. निवडून आल्यानंतर नव्या कायद्यानुसार वर्षाच्या आत प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक होते. तेही सादर न झाल्याने काल महापौर निवडीच्या दिवशी त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचा आदेश मिळाला.

या तिन्ही प्रभागांत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यास नव्या सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान नगरसेवकांच्या अपात्रतेमुळे स्थायी समितीच्या सदस्य संख्येत बदल होण्याची शक्‍यता आहे. सदस्य संख्या ८१ वरून ७८ पर्यंत खाली आली आहे. या संख्येनुसार काँग्रेसच्या वाट्याला सहा, राष्ट्रवादीच्या दोन, भाजपच्या तीन, ताताराणी आघाडीच्या चार तसेच शिवसेनेच्या वाट्याला एक सदस्य येतो. जानेवारीत ‘स्थायी’तील आठ सदस्य कमी होऊन त्यांच्या जागी नव्या आठ जणांची नियुक्ती होईल.

रामाणे यांच्याकडून वसुली करा
आश्‍विनी रामाणे यांनी जातीचा बोगस दाखला जोडून नगरसेवक तसेच महापौर म्हणून लाभ घेतले आहेत. त्याची वसुली करण्याची मागणी नगरसेवक सुनील कदम व किरण नकाते यांनी आयुक्तांकडे केली आहे. दोन नोव्हेंबर २०१५ ते डिसेंबर २०१८ पर्यंत नगरसेवक म्हणून पदाचे लाभ घेतले आहेत. १६ नोव्हेंबर ते २०१५ ते २५ नोव्हेंबर २०१६ अखेर महापौरपद स्वीकारले. वाहन, मानधन, बैठकीचा भत्ता यासह ज्या सुविधा घेतल्या आहेत, त्याची ३० दिवसांच्या आत वसुली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Kolhapur municipal by-election process