श्रीमंत शाहू छत्रपती महाराज रशियाला रवाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर - फुटबॉलवर निस्सीम प्रेम करणारे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आपल्या राजपरिवारासह रशियाला रवाना झाले. छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

कोल्हापूर - फुटबॉलवर निस्सीम प्रेम करणारे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आपल्या राजपरिवारासह रशियाला रवाना झाले. छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

केएसएचे पेट्रन इन चिफ शाहू महाराज फुटबॉलच्या गुणात्मक वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. शहरातील फुटबॉल ग्रामीण भागात पोहोचावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, होतकरू खेळाडूंना मदत करण्यात पुढाकार घेतात. छत्रपती शाहू स्टेडियम केवळ फुटबॉलसाठी त्यांनी सुसज्ज केले आहे. पंचवीस हजारांहून अधिक प्रेक्षक बसू शकतील, अशी त्याची क्षमता आहे. हंगामातील सर्व स्पर्धा याच मैदानावर होतात. विशेष असे, की ते सामने पाहण्यास आवर्जून उपस्थित राहतात. 

रशिया येथे सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा पाहण्याचेही त्यांना वेध लागले आहेत. त्यासाठी ते आज केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशस्वीराजे, यशस्विनीराजे यांच्यासमवेत रशियाला रवाना झाले. त्यांना शाहू विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमवेत माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, नितीन जाधव, संदीप घोरपडे हेही आहेत. यापूर्वी झालेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी ते जर्मनीला गेले होते.

Web Title: Kolhapur New Shahu Maharaj On Russia Tour