चंदगड तालुक्यातील किटवाड पाटबंधारे प्रकल्पातून पाण्याची गळती

अशोक पाटील
रविवार, 21 जानेवारी 2018

कोवाड - किटवाड (ता. चंदगड ) येथील लघु पाटबंधारे क्र. 1 च्या व्हॉल्वमध्ये अनोळखी व्यक्तीने बिघाड करून पाणी सोडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून तलावातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या विसर्गामुळे तलावाच्या पाणी साठ्यात घट झाली आहे.

कोवाड - किटवाड (ता. चंदगड ) येथील लघु पाटबंधारे क्र. 1 च्या व्हॉल्वमध्ये अनोळखी व्यक्तीने बिघाड करून पाणी सोडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून तलावातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या विसर्गामुळे तलावाच्या पाणी साठ्यात घट झाली आहे.

या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यापूर्वीही दोन वेळा असा प्रकार घडल्याने तलावाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

लघु पाटबंधाऱ्यातून पाणी सोडण्यासाठी कांही अज्ञात दोन दिवसापूर्वी व्हॉल्वमध्ये बिघाड केल्याने तलावातील पाणी वाया जात आहे. पाटबंधारे विभागाने याची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी.
- के.एन. तेऊरवाडकर,
 सरपंच, किटवाड

पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे येथे व्हॉल्वमध्ये बिघाड करून पाणी सोडण्याच्या घटना घडत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्याची चोरी करण्याच्या उद्देशाने वारंवार असा प्रकार होत आहे. यावर वेळीच पाटबंधारे विभागाने दखल घेण्याची गरज आहे. 

पाटबंधाऱ्याचा व्हॉल्व कुणीतरी सैल केल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. व्हॉल्वची दुरुस्ती करण्यासाठी कोल्हापूरहून टेक्नीशियनची मागणी केली आहे. दोन दिवसात पाण्याचा विसर्ग थांबेल.
- पी.बी. पाटील, 
शाखाधिकारी लघुपाटबंधारे विभाग चंदगड
 

किटवाड परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन शेतीला पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने 2000 साली लघुपाटबंधाऱ्याची उभारणी झाली. यामुळे शेकडो हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. किटवाड, होसूर, कालकुंद्री, कल्याणपूर व कागणी येथील शेतकऱ्यांना शासनाने पाणी उपसा परवाने दिले आहेत. त्यामुळे या तलावातील पाण्याच्या आधारावर शेतकऱ्यांनी खडकाळ शेकडो एकर जमिनीत शेती फुलविली आहे. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या पाणी वापरावरही अंकुश ठेवला आहे. दरवर्षी तलावातील पाणी साठ्यानुसार शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातो. पण काही  व्यक्तींकडून सतत तलावाच्या व्हॉल्वमध्ये अनाधिकृतपणे बिघाड करुन पाणी सोडले जाते. अशा प्रकाराने रात्रंदिवस व्हॉल्वमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला याची कल्पना दिली आहे. पण आद्याप व्हॉल्व दुरुस्त न केल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सध्या तलावात 84 टक्के पाणी साठा आहे. पण असेच पाणी वाया जात राहील्यास येत्या महिन्याभरात येथील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

Web Title: Kolhapur New water leakage in Kinwad water project

टॅग्स