कोल्हापूरात कोयत्याने हल्ला करत 20 लाख रूपये लुटले

राजेश मोरे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - राजेश मोटर्स जवळ दोघा लुटारूंनी कोयत्याने हल्ला करून 20 लाख रुपये असणारी बॅग चोरली. या घटनेत चारुदत्त अण्णा कोगे ( ७० रा. चिंचवाड, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले आहेत तर दिनकर बंडोपंत जाधव ( वय.65, शिवाजी पेठ) यांच्या डोळ्यात चटणी गेल्याने अस्वस्थ आहेत.  

घटनास्थळावरून मिळलेली माहिती अशी की चारूदत्त कोगे व दिनकर जाधव हे दोघे जमीन खरेदी विक्रीचे एजंट आहेत. आज दुपारी ते महाडिक काॅलनीत एकाकडून जमिनीच्या व्यवहाराचे पेमेंट घेण्यासाठी गेले होते. मिळालेले 20 लाख रूपये त्यांनी एका साध्या पिशवीतून ठेवले होते. हे दोघेजण रक्कम घेऊन दुचाकीवरून उद्यमनगरच्या दिशेने निघाले होते. तेथे ही रक्कम व्यवहारातील मालकास देणार होते. दुचाकीवरून जात असताना राजेश माेटर्सजवळ विरूद्ध दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोगे व जाधव यांची गाडी अडवली व हातातील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. ही बॅग देण्यास विरोध करणाऱ्या कोगे यांच्या हातावर कोयत्याने वार करून दोघा लुटारूंनी बॅग काढून घेतली. तसेच या दोघांनी त्यांच्यावर चटणी फेकली. काही समजण्याच्या आतच हे दोघे मार्केटयार्डच्या दिशेने पसार झाले. डोळ्यात चटणी गेल्याने माने हे अस्वस्थ झाले आहेत. कोगे व माने यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 

Web Title: Kolhapur News 20 lakh Rs. loot near Rajesh Motor