‘श्रीवर्धन’ची देश-विदेशात २० लाख गुलाब निर्यातीची लगबग

गणेश शिंदे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील फोंड्या माळरानावर फुलविलेल्या ‘श्रीवर्धन बायोटेक’मधील रंगबीरंगी १५ लाख गुलाब यावर्षी परदेशात निर्यात केले जात आहेत. याशिवाय देशांतर्गत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, हुबळी, कोल्हापूर आदी बाजारपेठांमध्ये पाच लाख गुलाब दाखल होणार आहेत.

जयसिंगपूर - ‘मातीविना शेती’च्या प्रयोगातून फुलविलेला गुलाब ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लड (युके), ग्रीस आणि इटलीतील प्रियजनांचे नाते यावर्षीदेखील दृढ करणार आहे. दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील फोंड्या माळरानावर फुलविलेल्या ‘श्रीवर्धन बायोटेक’मधील रंगबीरंगी १५ लाख गुलाब यावर्षी परदेशात निर्यात केले जात आहेत. याशिवाय देशांतर्गत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, हुबळी, कोल्हापूर आदी बाजारपेठांमध्ये पाच लाख गुलाब दाखल होणार आहेत.

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कोंडिग्रेच्या माळरानावर चिटपाखरूही फिरणार नाही, अशा भागात श्रीवर्धनच्या रूपाने नंदनवन फुलविले आहे. जिद्द, चिकाटी, अभ्यास आणि बाजारपेठेचा वेध घेऊन त्यांनी शंभरहून अधिक एकरांत हा स्वर्ग निर्माण केला आहे. येथील हरितगृहात वीसहून अधिक प्रकारच्या गुलाबाचे उत्पादन घेतले जाते.

‘व्हॅलेंटाईन डे’ आणि ‘श्रीवर्धनचा’ गुलाब यांच्यातदेखील एक दृढ नाते आहे. ऑस्ट्रेलिया, जपान, यु. के., ग्रीस आणि इटलीतील बाजारपेठेत ‘श्रीवर्धन’च्या गुलाबांना चांगली मागणी आहे. परदेशाबरोबर देशांतर्गत बाजार पेठेतही गुलाबाला मोठी मागणी आहे.
- उद्यानपंडित गणपतराव पाटील,

अध्यक्ष, दत्त उद्योग समूह व श्रीवर्धन बायोटेक.

याशिवाय मागणी लक्षात घेऊन जर्बेरा, कार्नेशन, कॅप्शिकम, ऑर्केड आदी प्रकारच्या फुलांचे उत्पादनही घेतले जाते. मन प्रफुल्लित करणारा एकाहून एक गुलाब श्री. पाटील यांच्या अफाट कृषी कार्याची साक्ष देते. या यशस्वी कृषी प्रकल्पामुळे माळरान पिकाखाली आणण्याबरोबर भागातील अनेक महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी त्यांनी मिळवून दिली आहे. सामान्य तापमानाशी संपर्क आल्यानंतर कळ्या पुन्हा उमलू लागतात. आधुनिक पद्धतीचे पॅकिंग रूम, कोल्ड स्टोअरेजमुळे फुलांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. पंतनगर, दिल्ली आणि केरळ युनिव्हर्सिटीतील नवनवे प्रयोग आणि विविध संशोधनांचा अभ्यास करण्यात आल्याने हा प्रकल्प यशस्वी होण्यास हातभार लागला आहे. 

Web Title: Kolhapur News 20 lakhs Rose Export for Valentine day