शहरवासीयांना २० टक्के पाणी दरवाढीचा दणका?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

कोल्हापूर - कोल्हापूर शहरवासीयांनाही पाणीदरवाढीचा भार सोसावा लागणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नवीन पाणी दरवाढ जाहीर केल्याने शहरातही पाणी बिलात वीस टक्के दरवाढीची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महिन्याभरात पाणीदरवाढीचा हा प्रस्ताव प्रशासनाकडून महापालिका सर्वसाधारण सभेसमोर ठेवला 
जाणार आहे.

पाण्याच्या दरात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सात वर्षांनंतर वाढ केली. घरगुती पाणी दरवाढ १५ ते २० टक्के अपेक्षित आहे. महापालिका पंचगंगा नदीतील नागदेववाडी, शिंगणापूर, बालिंगा येथून प्रतिदिवशी १२० एमएलडी पाणी उपसा करते. यापूर्वी प्रतिहजार लिटरला ४२ पैसे आकारणी केली जात होती. आता त्यात आठ पैसे वाढ होणार आहे. यापुढे प्रतिलिटर ५० पैसे वाढ होणार आहे. महापालिका व्यापारी कारणासाठी साडेतीन टक्के पाणीउपसा करते. या पाणी आकारणीचा सध्या सहा रुपये ४० पैसे आहे.

वाढीनंतर हा दर ६० पैशांवर पोचणार आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यासाठी प्रतिलिटर वेगळे दर जलसंपत्ती मंडळाकडून आकारले जातात. औद्योगिक कारणासाठी प्रति एक हजार लिटरसाठी हिवाळ्यात 
६४ रुपये, उन्हाळ्यात ९६ तर पावसाळ्यात ३२ रुपये आकारले जातात. सर्वसाधारण वीस टक्के दरवाढ असल्याने महापालिका प्रशासनाला पाणी घेणाऱ्या ग्राहकांना जादा दराने पाणी आकारणी करावी लागणार आहे.

महापालिकेला जलसंपदा विभागाला या बिलापोटी वर्षाला पाच ते सहा कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. महापालिकेच्या अंदाजपत्रकात  साडेतीन कोटी रुपयांची तरतूद केली जाते. दोन वर्षांपूर्वी दर दोन महिन्यांनी जलसंपदा विभागाकडून आकारणी केली जात होती. सध्या ही आकारणी महिन्याला केली जाते. महापालिकेने यापूर्वी २०१३ मध्ये २५ टक्के दरवाढ केली आहे. तसेच पाणी बिलावर दहा टक्के सांडपाणी अधिभार आकारला जातो.

Web Title: kolhapur news 20 percentage water rate increase