करवीरमध्ये २७१४ जणांना कर्करोग झाल्याचा संशय

करवीरमध्ये २७१४ जणांना कर्करोग झाल्याचा संशय

कोल्हापूर - करवीर तालुक्‍यात घेतलेल्या कर्करोगपूर्व लक्षणे व कर्करोग रुग्ण शोध मोहिमेत २७१४ संशयित रुग्ण आढळून आले. पैकी ३६ रुग्णांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. सहा सर्वेक्षण शिबिरांतून ही माहिती पुढे आली आहे. 

जिल्हा नियोजन विभागाने नावीन्यपूर्ण योजनेतून या सर्वेक्षणासाठी २९ लाख रुपये दिले होते. शिबिरात जे संशयित रुग्ण आढळले, त्यांच्यावर उपचारासाठी नियोजन मंडळाकडून प्रत्येकी १५ हजारांची मदत केली जाणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे सादर केला आहे. 

जिल्ह्यात कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने सर्वच तालुक्‍यांत सर्वेक्षणाचा निर्णय जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी शिरोळ तालुक्‍यात सर्वेक्षण झाले होते. कोल्हापूर शहरातील दोन खासगी कर्करोग उपचार रुग्णालयांच्या मदतीने करवीर तालुक्‍यात सर्वेक्षण करण्यात आले. 

संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी करवीर तालुक्‍यात सहा शिबिरे झाली. आशा सेविकांना त्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी गावोगावी फिरून कर्करोगाचे २७१४ संशयित रुग्ण असल्याचा अहवाल दिला होता. या सर्व रुग्णांना शिबिरात येण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २७१४ पैकी ८०३ रुग्णांनी शिबिरात भाग घेतला.

शिबिर झालेली गावे (कंसात तपासलेले रुग्ण) 
भुये (६१८), हसूर दुमाला (१९६), कणेरी (४५२), शिरोली दुमाला (३१२), इस्पुर्ली (५५२), मुडशिंगी (५८४). शिबिरात सर्वाधिक संशयित रुग्ण भुये येथे तर सर्वात कमी संशयित हसूर दुमाला येथे आढळले. 

कर्करोगाचा प्रकार व संशयितांची संख्या
तोंडाचा  ः ३० 
गर्भाशय बीज कोष ः  ५९ 
स्तनाचा ः ५२ 
इतर ः १७४ 
एकूण ः ३१५ 
कर्करोगाचे निदान झालेले रुग्ण ः ३६

करवीर तालुक्‍यात अडीच हजारांहून अधिक कर्करोगाचे संशयित आढळले आहेत. पैकी ४० टक्के लोकांना तंबाखूमुळे कर्करोगामुळे झाला आहे. उर्वरित महिलांना स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग दिसून आला आहे. तंबाखू सेवन, बदलती जीवनशैली अशी कारणे असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. आता जिल्ह्याचेही सर्वेक्षण केले जाईल. विशेष करून शिरोळ तालुक्‍याचे सर्वेक्षण टाटा इन्स्टिट्युट आणि कोल्हापूर कर्करोग सेंटर एकत्रितपणे करणार आहे.
- डॉ. सूरज पवार,
कर्करोगतज्ज्ञ 

शिरोळचा आकडा वाढताच
जयसिंगपूर - शिरोळ तालुक्‍यात कर्करोगाचे १८ हजार ५०० हून अधिक रुग्ण संख्या असल्याने नदी प्रदूषणमुक्तीची चळवळ हाती घेतली आहे. राज्यातील इतर तालुक्‍यांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. शासनाच्या महाआरोग्य शिबिरात सातशेहून अधिक नव्याने रुग्ण आढळले आहेत.

शिबिरात नोंदणी झालेले ः     803 
विविध कर्करोगांचे संशयित ः     315 
शिबिरानंतर वैद्यकीय तपासणी झालेले ः     622 
पुढील तपासणीसाठी संदर्भीत रुग्ण ः     71 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com