कोल्हापूरात वादळी पावसाने 4.5 कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

कोल्हापूर - जिल्ह्याला काल (ता. १०) वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांवरील पत्रे उडून गेले, विजेचे खांब कोसळले, तसेच अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरले. पावसाच्या या तडाख्यात सुमारे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

कोल्हापूर - जिल्ह्याला काल (ता. १०) वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांवरील पत्रे उडून गेले, विजेचे खांब कोसळले, तसेच अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरले. पावसाच्या या तडाख्यात सुमारे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका हातकणंगले तालुक्‍याला बसला. येथे अनेक घरांची पडझड झाली. इचलकरंजी शहरात एका मॉलसह ५०, तर हातकणंगले येथे ४८ घरांची पडझड झाली. केवळ इचलकरंजी शहरात दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले आहेत.
काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात विजेचे ४०७ खांब कोसळल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी व्यवसाय बंद राहिले. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी १५ ते १८ तास काम करून ९५ टक्‍क्‍यांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला. अनेक ठिकाणी केळीच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या; तर आंब्यालाही मोठा फटका बसला.

तालुकावार नुकसान 
हातकणंगले 
 इचलकरंजी ः ५० घरे व एक मॉलची पडझड : नुकसान दोन कोटी
 शिरोळ- यड्राव ः एक घर ः नुकसान ६० हजार
 जांभळी ः एक घर व ग्रीन हाउसचे नुकसान 
 शाहूवाडी : सोनवडे येथे एका घराची पडझड : नुकसान २० हजार
राधानगरी तालुका 
 आमजाई व्हरवडे : सात घरांची    पडझड : नुकसान सात लाख
 घोटवडे : ग्रामपंचायत व घराची पडझड ः नुकसान ३० हजार
करवीर तालुका
 पाच घरांची पडझड ः नुकसान एक लाख
गडहिंग्लज तालुका
शिपूर तर्फे आजरा ः दोन घरांची पडझड

हातकणंगले तालुका नुकसान
हुपरी ः पाच घरांची पडझड : नुकसान पाच लाख
हातकणंगले ः ४८ घरांची पडझड : नुकसान ३५ लाख
बिरदेववाडी : एका घराची पडझड : नुकसान ५० हजार
कुंभोज ः एका घराची पडझड : नुकसान ४५ हजार
रुई ः १९ घरांची पडझड ः नुकसान तीन लाख २५ हजार
साजनी : नऊ घरांची पडझड : नुकसान सात लाख
तिळवणी : सात घरे व एका पोल्ट्रीची पडझड : नुकसान १५ लाख
माणगाव : आठ घरांची पडझड : नुकसान २५ लाख
माणगाववाडी ः आठ घरांचे नुकसान ः दोन लाख
चंदूर : ७० घरे व एका गोठ्याची पडझड : नुकसान २५ लाख
कबनूर : ३५ घराचे नुकसान ः नऊ लाख
शहापूर : ४३ घरांची पडझड : नुकसान ३५ लाख
तारदाळ : ६० घरांची पडझड : नुकसान ३५ लाख
खोतवाडी ः १५ घरांची पडझड ः नुकसान १२ लाख
हुपरी : पाच घराचे नुकसान ः पाच लाख
चोकाक : एका घराची पडझड : नुकसान ५० हजार
अतिग्रे ः दोन घरांची पडझड : नुकसान एक लाख ७० हजार
हेर्ले ः आठ घरांची पडझड : नुकसान एक लाख ५० हजार
हालोंडी ः एका घराची पडझड : नुकसान ४० हजार
माले : पाच घरांची पडझड : नुकसान एक लाख ५० हजार
मुडशिंगी : एका घराची पडझड : नुकसान एक लाख ६० हजार

Web Title: Kolhapur News 4.5 cores loss due to stormy rains