‘मुद्रा’योजनेंतर्गत ५०४ कोटींचे अर्थसहाय्य - अविनाश सुभेदार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

कोल्हापूर - प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार ६९८ लाभार्थ्यांना ५०४ कोटी ६७ लाखांचे अर्थसहाय्य विविध बॅंकांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज येथे दिली.

मुद्रा बॅंक योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्या वेळी ते बोलत होते. 

कोल्हापूर - प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार ६९८ लाभार्थ्यांना ५०४ कोटी ६७ लाखांचे अर्थसहाय्य विविध बॅंकांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज येथे दिली.

मुद्रा बॅंक योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा अग्रणी बॅंकेचे अधिकारी रवींद्र बार्शीकर, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योग केंद्राचे ज. बा. करीम यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

श्री. सुभेदार म्हणाले, ‘मुद्रा योजना ही होतकरू, बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार ६९८ लाभार्थ्यांना ५०४ कोटी ६७ लाखांचे अर्थसहाय्य विविध बॅंकांच्या माध्यमातून करण्यात आले असून यामध्ये शिशू योजनेंतर्गत २७ हजार ३८१ तरुणांना १२७ कोटी ४४ लाख, किशोर योजनेंर्गत ५ हजार २७४ तरुणांना २६५ कोटी १२ लाख आणि तरुण योजनेंतर्गत १ हजार ४३ तरुणांना ११२ कोटी ११ लाखाचे अर्थसहाय्य केले आहे. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत करुन मुद्रा बॅंक योजनेची 
माहिती दिली.

योजना काय 
या मुद्रा बॅंक कर्ज योजनेंतर्गत तीन गटामध्ये कर्ज उपलब्ध करु दिले जात असून शिशू गटासाठी १० हजार ते ५० हजार, किशोर गटासाठी ५० हजार ते ५ लाख आणि तरुण गटासाठी ५ ते १० लाख असे कर्ज जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीय, प्रादेशिक ग्रामीण बॅंका, बिगर बॅंक वित्तीय संस्थामार्फत उपलब्ध करुन दिले जात आहे. तसेच सुतार, गवंडी काम, कुंभार, सलुन, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते इत्यादी लहान स्वरुपाच्या व्यवसायासाठीही कर्ज दिले जाते.

बॅंकनिहाय झालेले कर्जवाटप (आकडे कोटी रुपयात)
स्टेट बॅंक ऑफ इंडिया - ७१.४३, अलाहाबाद बॅंक - ५१. १३, पंजाब नॅशनल - ४२.९७, एच.डी.एफ.सी.- ४०.७०, रत्नाकर - २४. ७०, आयसीआयसी - २०.९२, युनियन बॅंक - २३.२८, आयडीबीआय- १२.९८, सिंडिकेट- १२.४१, फेडरल- ७.६४, इंडियन- ८.२, कॅनरा - ६.८२, बॅंक ऑफ बरोडा- ६. ४६, वेंग कृष्णा ग्रामीण - ५.८३,  युको - ३.६३, इंडियन ओव्हरसिस - ५.१३, कॉर्पोरेशन- ३.८०, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया - १.८६, देना बॅंक - १.८५, स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद - १.१७, विजया बॅंक- १.७६, ॲक्‍सीस- १.३२, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स- ०.६१, स्टेट बॅंक ऑफ पटीयाला- ०.४४, स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर ०.४१, कर्नाटका बॅंक ०.६०, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया ०.२०.

Web Title: kolhapur news 504 crore finance by mudra scheme