कोल्हापूर जिल्ह्यात कोटींची अतिरिक्त साखर उघड्यावर

सुनील पाटील
बुधवार, 16 मे 2018

कोल्हापूर - देशात उसाचे आणि साखरेचे उत्पादन अतिरिक्त झाले आहे. याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील वीस ते बावीस कारखान्यांना बसला आहे. यावर्षी साखरेची विक्री जलदगतीने होत नसल्याने उत्पादन झालेली सर्व साखर गोदामात पडून आहे, तर गोदाम फुल्ल झाल्यामुळे सुमारे ४०० कोटी रुपयांची साखर कारखान्याबाहेर उघड्यावरच रामभरोसे ठेवावी लागली आहे.

कोल्हापूर - देशात उसाचे आणि साखरेचे उत्पादन अतिरिक्त झाले आहे. याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील वीस ते बावीस कारखान्यांना बसला आहे. यावर्षी साखरेची विक्री जलदगतीने होत नसल्याने उत्पादन झालेली सर्व साखर गोदामात पडून आहे, तर गोदाम फुल्ल झाल्यामुळे सुमारे ४०० कोटी रुपयांची साखर कारखान्याबाहेर उघड्यावरच रामभरोसे ठेवावी लागली आहे. जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामध्ये भोगावती साखर कारखान्यांची मोठ्या प्रमाणात साखर भिजली. यामध्ये कारखान्याचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यातील सर्वच कारखाने आपली साखर गोदामात साठा करून ठेवतात; मात्र यावर्षी गोदाम फुल्ल झाली आहेत. उर्वरित साखर ठेवण्याचा मोठा प्रश्‍न सर्वच कारखान्यांसमोर आहे. एका कारखान्यांची सुमारे ५० हजार क्विंटल ते १ लाखाहून अधिक क्विंटल साखर कारखाना परिसरात थप्पी मारून ठेवावी लागते. 
याला सध्यातरी कोणताही पर्याय नाही. जोपर्यंत साखर विकली जात नाही, तोपर्यंत ती रस्त्यावरच पण सुरक्षित ठेवण्यासाठी साखर कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे. 

साखरेचा उठाव झालेला नाही. मोठ्या प्रमाणात साखर झाकून ठेवावी लागली आहे. उघड्यावर ठेवलेल्या साखरेसाठी विशेष काळजी घेतली जाते, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या मोठ्या वादळामुळे एका कारखान्याची साखर भिजली आहे. निसर्गापुढे कोणाचेही काय चालत नाही, तरीही आवश्‍यक ती काळजी घेतलेली असते. 
- पी. जी. मेढे,
ज्येष्ठ साखर व्यापार तज्ज्ञ

साखर भिजून नये यासाठी कारखान्यांनी कारखाना परिसरातच दोन ते तीन फुटांचे सिमेंटचा उंचवठा बांधून घेतला आहे. यावर ५० हजार ते १ लाख पोत्यांची थप्पी मारून ठेवलेली आहे. पोती भिजून नयेत किंवा उन्हाचा तडाखा जाणवू नये यासाठी ही या पोत्यांवर मोठ्या आणि जाड ताडपत्र्या झाकून ठेवल्या आहेत. याची राखण करण्यासाठी दोन ते तीन सुरक्षारक्षकही नियुक्त केलेत. 

उठाव होईपर्यंत जबाबदारी
जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यांची ५० हजार ते १ लाख साखर पोती उघड्यावर आहेत. जिल्ह्यात वीसहून अधिक कारखान्यांची सुमारे २० लाखांहून अधिक क्विंटल साखर उघड्यावर आहे. सध्या या साखरेला प्रतिक्विंटल २६०० ते २७०० रुपये दर सुरू आहे. याची सरासरी ५२० कोटींचे साखर उघड्यावर पडली आहे. जोपर्यंत साखरेचा उठाव होत नाही. तोपर्यंत कारखान्यांना धोका पत्करावा लागणार आहे. 

Web Title: Kolhapur News 520 cores sugar outside the Go down