कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के जमिनीचा पोत सकस...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कोल्हापूर - ‘‘जिल्ह्यातील शेतजमिनीच्या मातीचे परीक्षण झाले. यात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन सकस असल्याचे स्पष्ट झाले आहे. रासायनिक खतांची मात्रा १० ते २५ टक्‍क्‍यांनी कमी केली, तरी पिकेही चांगली येऊ शकतात.

कोल्हापूर - ‘‘जिल्ह्यातील शेतजमिनीच्या मातीचे परीक्षण झाले. यात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन सकस असल्याचे स्पष्ट झाले आहे. रासायनिक खतांची मात्रा १० ते २५ टक्‍क्‍यांनी कमी केली, तरी पिकेही चांगली येऊ शकतात. मात्र, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर झाल्याने जमिनीचा पोत बिघडल्याचे प्रकार शिरोळपाठोपाठ हातकणंगले तालुक्‍यात दिसत आहेत. तेथे उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याला शेतकऱ्यांचे पाठबळ मिळावे,’’ असे मत जिल्हा मृद संधारण अधिकारी डॉ. महावीर लाटकर यांनी व्यक्त केले.

माती परीक्षण करून जमिनीचे आरोग्य कसे आहे, हे समजून घेण्यासाठी ‘साईड हेल्थ कार्ड योजना’ देशभर चालविण्यात येते. देशभरातील १२ कोटी शेतकऱ्यांनी सॉईल हेल्थ कार्ड दिले. यात महाराष्ट्रात दीड कोटी शेतकऱ्यांना या कार्डचे वितरण झाले.  

या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील मृद परीक्षणाविषयी श्री. लाटकर यांना विचारले असता, ते म्हणाले, की जिल्ह्यातील पश्‍चिम भागात सर्वाधिक पावसाचे प्रमाण आहे. डोंगरदऱ्या असल्याने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण चांगले आहे. अशा भागातील जमिनी सुपीक आहेत; तर हातकणगंले, शिरोळ तालुक्‍यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. अशात थोड्याफार फरकाने सर्वच भागांत रासायनिक खत वापरण्याचे प्रमाण जास्त दिसते.

ज्या भागात पाण्याचा निचरा होत नाही, अशाच भागात क्षारपड जमीन तयार होते. तेथे पीक वाढण्यास मर्यादा येतात, अशी स्थिती शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांतील गावांत सर्वाधिक आहे.

सॉईल कार्ड योजनेत कोल्हापूर राज्यात चौथे 
सॉईल कार्ड योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात पाच लाख १७ हजार सॉईल कार्ड वाटप झाली. जिल्ह्यातील सहा लाख ४९ हजार शेतकरी योजनेत आहेत. जमिनीतील पोत कोणत्या पिकास लागू पडतो, ही बाब समजून घेता येणार आहे. त्यानुसार येथील जमिनीत नायट्रोजन, स्फुरद, पलाशचे प्रमाणे चांगले आहे. १० ते २५ टक्के रासायनिक खतांची मात्रा कमी दिली तरी पिके चांगली येऊ शकतात, असे मत श्री. लाटकर यांनी व्यक्त केले.   

पोत सुधारण्यासाठी उपाययोजना 
डॉ. लाटकर म्हणाले, ‘‘ज्या शेतीत रासायनिक खते वापरतात, तिथे पाणी वाहून न जाता अडून राहते. अवतीभोवती झालेली बांधकामे, रस्ते, भराव यामुळे पाण्याचा निचरा होण्याच्या जागा बुजल्या आहेत. दीर्घकाळ रासायनिक खतमिश्रीत पाणी साचून राहिल्याने तेथील जमिनीचा पोत बिघडला. पोत बिघडलेल्या जमिनीच्या भोवतीने तीन फूट खोल, दोन फूट रुंद खोलीचा खड्डा मारून त्यात जमिनीतील पाण्याचा निचरा करणे, लिंबोळी, सरकीची पेंड टाकणे अशा उपाययोजनांतून जमिनीतील पोत सुधारणा करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.’’ 

Web Title: Kolhapur News 75 percent land fertile in District