रायगडावर एकाच वास्तूत मिळाल्या नऊशे वस्तू

संदीप खांडेकर
बुधवार, 6 जून 2018

रायगड - चाळीस शिवराई (तांब्याची नाणी), दगडी पणत्या, पाटे, वरवंटे, चांदीची जोडवी, बांगड्या अशा अनेक वस्तूंचा खजिना रायगडावरील केवळ एका वास्तूत मिळाला आहे. तीन महिन्यांच्या उत्खननाने शिवकालीन जीवनाचे पदर यातून उलगडले जात आहेत. या वस्तूंबाबतचा अहवाल येत्या काही दिवसांत तयार केला जाणार असला तरी शिवभक्तांची या वस्तूंनी उत्सुकता ताणली आहे. 

भारतीय पुरातत्त्व विभाग व डेक्कन कॉलेजतर्फे मार्चमध्ये उत्खननास सुरवात झाल्यानंतर वस्तू मिळणार तरी कोणत्या, याची उत्कंठा होती. डेक्कनच्या विद्यार्थ्यांनी उन्हाचा तडाखा असतानासुद्धा उत्खननाच्या कामात झोकून दिले. विशेष म्हणजे उत्खननात पाच-सहा प्रकारचे वीस किलो खिळे, सोन्याच्या वस्तू, शिवलिंग, मणी, तांब्याच्या साखळ्या, मातीची भांडी, प्राण्यांची हाडे मिळाली आहेत. शिवकालीन जीवनाचा आरसा म्हणून वस्तूंकडे पाहिले जात आहे. 

होळीचा माळ परिसरातील हत्तीखान्यात या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तूर्त त्या शिवभक्तांना पाहण्यास खुल्या करण्यात आलेल्या नाहीत. पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून या वस्तूंची माहिती दिली जात आहे. ज्या वास्तूत उत्खनन करण्यात आले. त्याच वास्तूत धान्याचे काही कणही मिळाले आहेत.

शिवकाळातील लोकांच्या आहारात नक्की कोणत्या घटकांचा समावेश होता, यावर प्रकाश पडणार आहे. गिरीश जाधव म्हणाले, ‘‘रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडच्या उत्खननाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मिळणाऱ्या वस्तूंमधून नवा इतिहास लोकांसमोर येईल.’’

 जेथे उत्खनन केले जात आहे. ज्या वास्तूचे उत्खनन झाले, ती स्वराज्यातील बड्या अधिकाऱ्याची असावी, असा अंदाज बांधता येतो. पण, नक्की कोणत्या अधिकाऱ्याची, हे सांगणे कठीण आहे.
अरविंद आसबे, अभ्यासक

Web Title: Kolhapur News 900 good found in Excavation on Raigad