‘साम’वर उद्यापासून ‘आई अंबाबाई’ मालिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असलेली श्री अंबाबाई. नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून अंबाबाईची रोजची पूजा, आरतीचा सोहळा घरबसल्या यंदाही पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अंबाबाईची महतीही अनुभवायला मिळेल. निमित्त आहे, ‘साम मराठी’ वाहिनीवर गुरुवार (ता. २१)पासून प्रसारित होणाऱ्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत ‘आई अंबाबाई’ या मालिकेचे.

या विशेष मालिकेचे मुख्य प्रायोजक माणिकचंद ऑक्‍सिरिच, तसेच चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था विशेष प्रायोजक आहेत. चितळे उद्योगसमूह, जाधव इंडस्ट्रीज, वारणा दूध संघ आणि पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक सहप्रायोजक आहेत. यंदा या मालिकेचे नववे वर्ष आहे.

देशात ५१ शक्तिपीठे व राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या आई अंबाबाईच्या मंदिरात नवरात्रोत्सव सोहळा थाटामाटात साजरा होतो. अंबाबाईची महती व तिच्या मंदिराचे वैभव काही न्यारेच. त्याचबरोबर नवरात्रोत्सवातील परंपराही वेगळी आहे. ही सारी महती अभिनेत्री तेजा देवकर, वीणा जामकर, हेमांगी कवी आणि सागर तळाशीकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदनातून उलगडणार आहे. २१ ते २९ सप्टेंबरदरम्यान रात्री साडेनऊला प्रसारित होणारी ही मालिका लोकसंस्कृतीतील दसरा, नवरात्रोत्सव या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. लोकसंस्कृती आणि नवरात्रोत्सवाची अनोखी गुंफण मालिकेतून पाहायला मिळेल. त्याशिवाय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची पर्वणीही असेल. याचे पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी दुपारी अडीचला होईल. कोल्हापुरात प्रथमच होणाऱ्या नवऊर्जा महोत्सवाचे कव्हरेजही या मालिकेतून दिले जाणार आहे.

आकर्षक बक्षिसेही
प्रेक्षकांसाठी यंदाही प्रश्‍नमंजूषा स्पर्धा होणार असून, पाच महाविजेत्यांना श्री अंबाबाईची थ्री डायमेन्शनल प्रतिमा आणि मंदिरात अभिषेकाची संधी दिली जाईल. पाच उपविजेत्यांना अंबाबाईची नथ बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. पोस्टकार्ड व ‘एसएमएस’द्वारे मालिकेतून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरे प्रेक्षकांना पाठवायची आहेत. त्यातून लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेते जाहीर केले जातील.

Web Title: kolhapur news aai ambabai serial on saam tv