शाहूनगरीत संधीचे सोने करणार - अभिनव देशमुख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करू, अशी ग्वाही नूतन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. शुक्रवारी (ता. ३) पदभार स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करू, अशी ग्वाही नूतन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. शुक्रवारी (ता. ३) पदभार स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची पद्दोन्नतीने नाशिक येथील पोलिस अकादमीच्या उपसंचालकपदी बदली झाली. त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक देशमुख यांची नियुक्ती झाली. याबाबतचे आदेश काल रात्री उशिरा गृहखात्याकडून प्राप्त झाले. श्री. देशमुख मूळचे पोहणेर (ता. तुळजापूर) येथील आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते आयपीएस अधिकारी म्हणून २००९ मध्ये दलात रुजू झाले. यापूर्वी त्यांनी पुणे एसआरपीएफ, भंडारा येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर त्यांची नियुक्ती सातारा पोलिस अधीक्षकपदी झाली.

गुंडांच्या मुसक्‍या आवळण्याबरोबर त्यांनी पोलिस कल्याणासंदर्भात विविध योजना राबविल्या. गणेशोत्सव, शिवजयंती, राजकीय दौरे, निवडणूक आदी बंदोबस्तात पोलिसांच्या जेवणाचे होणारे हाल दूर करण्यासाठी त्यांनी ‘अन्नपूर्णा व्हॅन’ ही योजना आणली. त्यानंतर त्यांची बदली गडचिरोलीला झाली. तिसऱ्याच दिवशी त्यांनी २८ लाखांचे बक्षीस असणाऱ्या तीन जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करत आपल्या धडाकेबाज कामाची सुरवात केली. त्यानंतर गेल्या अडीच वर्षात त्यांनी नक्षलवादांच्या मुसक्‍या आवळत कायदा व सुव्यवस्था यशस्वीपणे आबाधित राखली.

राजर्षी शाहूंच्या नगरीत काम करण्याची संधी मिळणे हे माझ्ये भाग्य आहे. येथील गुंडगिरी, अवैध धंदे डोके वर काढणार नाही, यासाठी आवश्‍यक उपाययोजना प्रामुख्याने करू. पोलिसांच्या कल्याणासाठी विविध योजना उपक्रम राबवून त्यांचा ताण कमी करण्यावरही भर राहील. सामान्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. गुरुवारी (ता. २) कोल्हापुरात येणार असून, शुक्रवारी पदाची सूत्रे हाती घेऊ.
- अभिनव देशमुख,
नूतन पोलिस अधीक्षक

Web Title: Kolhapur News Abhinvav Deshmukh comment