बार्शी - मालवण एसटीला अपघात, १५ प्रवासी जखमी

राजू पाटील
सोमवार, 21 मे 2018

राशिवडे बुद्रुक - बार्शीहून मालवणकडे जाणाऱ्या एस. टी. बसला आज दुपारी तीन वाजता कांडगावनजीक अपघात झाला. यात 15 प्रवासी जखमी झाले. स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने रस्त्याकडेच्या ओढ्यात ही गाडी उलटली. कांडगाव (ता. करवीर) ते वाशी दरम्यान असलेल्या हायस्कूलसमोरील वळणावर हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले .

बार्शीहून सकाळी साडेसहा वाजता सुटलेली एम.एच.14 बी.टी. 2677 ही गाडी दुपारी अडीच वाजता कोल्हापूर येथे थांबा घेवून मालवणकडे निघाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास कांडगाव हायस्कूलच्या समोरील वळणावर आल्यानंतर वळण घेताना गाडीचा स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटला व ही गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या चरीत घूसून ओढ्याच्या पात्रात एका बाजूवर उलटली. 42 प्रवाशापैकी एस.टी. चालकांसह 15 प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

कोल्हापूर - राधानगरी कोकण या राज्यमार्गावर मोठी वर्दळ असते. याचवेळी दुसरे एखादे वाहन समोरुन आले असते तर मोठा अनर्थ घडला असता. अपघातानंतर या मार्गावरून जाणारे प्रवाश्यांसह  कांडगाव येथील ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढण्यात मोठे मदतकार्य केले.

जखमींची नावे अशी - अरुण संभाजी शिंदे (वय52,कोंडवे, ता. सातारा), गोजाबाई बाळू पोवार( वय 56), बाळू तातोबा पोवार(65, दरवेश पाडळी, ता. हातकणंगले), मनश्री महेंद्र लोकरे(4), विमल श्रीमंत लोकरे( 54, बार्शी ), शांता दिलीप जगदाळे ( 46, अंबरनाथ, मुंबई), सुप्रिया अशोक मुसळे (48) अशोक लहू मुसळे (56 रा. सुकळवाड, ता. मालवण), रमेश सिताराम नारकर( 68, फोंडा) , अमित आनंद सावंत( 39, त्रिंबक, ता. मालवण), प्राची संतोष कोकणे( 1 वर्षे 2 महिने), सविता संतोष कोकणे( 25, डिगस, ता. राधानगरी), दिलिप राजाराम वेलणकर(जुहारी, राजापूर) व अन्य दोघे जखमी आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. . 

Web Title: Kolhapur News accident Barshi - Malvan bus