चंदगड तालुक्यात देवरवाडी येथे ट्रकच्या धडकेत दोघेजण ठार

सुनील कोंडुसकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

चंदगड - देवरवाडी (ता. चंदगड) येथे ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले. जोतिबा पवार (वय 42) व चाळोबा रेंबुळकर (40, दोघेही रा. ढेकोळी, ता. चंदगड) अशी त्यांची नावे आहेत.

चंदगड - देवरवाडी (ता. चंदगड) येथे ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले. जोतिबा पवार (वय 42) व चाळोबा रेंबुळकर (40, दोघेही रा. ढेकोळी, ता. चंदगड) अशी त्यांची नावे आहेत.

मोठा उतार आणि त्याचवेळी वळण असल्याने ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रकची मोटरसायकलला मागून जोराची धडक बसली. या धडकेत ट्रकची समोरची बाजू चेपली आहे एवढी ही धडक जोरात होती. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. 

मयत पवार व रेंबुळकर हे नातेवाईकांच्या लग्नासाठी देवरवाडी येथे आले होते. लग्नविधी झाल्यावर भेटवस्तू आणण्यासाठी म्हणून ते मोटरसायकलवरुन (एमएच 09 ईडी 8165) दुकानाकडे चालले होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. पेव्हींग ब्लॉक्‍स भरुन येणाऱ्या ट्रकने (केए 05 एबी 2259) त्यांना मागून जोराची धडक दिली.

जोतिबा यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे व मुलगी तर चाळोबा यांना पत्नी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान चंदगड पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात पाठवले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

 

Web Title: Kolhapur News accident in Devarwadi chandgad Taluka